नाशिक प्रतिनिधी
आजकाल राजकारणात आपला हित साधून घेण्या करीता पाहिजे तसा नियमांचा वापर केला जात आहे, आणि या सर्व राजकीय चढाओढीत संवैधानिक नैतिकतेचा रोज बळी दिला जात आहे, साधारण जनतेला संवैधानिक नैतिकता म्हणजे काय याचेच ज्ञान नसल्याने ती हि गपगुमान सर्व बघत आहे, परंतु या सर्व परिस्थितीला बघून मविप्र विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी संविधानातील नैतिकता व संविधानाच्या मूल्यांचे रक्षण करण्याचा निर्धार केला आहे, यासाठी तरुण पिढी पुढे येत असल्याचे गौरोवोद्गार के. के. वाघ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ज्ञानोबा ढगे यांनी काढले. मविप्र विधी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवायोजन कार्यक्रम आयोजित संविधान जनजागृती कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाप्रसंगी विधी महाविद्यालयाच्या विकास समितीचे अध्यक्ष ॲड. भास्कर चौरे , प्राध्यापक व रा. से. यो नाशिक जिल्ह्यातील विभाग समन्वयक डॉ. गोरक्षनाथ पिंगळे, विधी महाविद्यालयाच्याच्या प्राचार्या डॉ. संध्या गडाख आदी उपस्थित होते. राष्ट्रीय सेवायोजन मोहीम संविधान दिनाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून तरुणांच्या महत्त्वाकांक्षी मोहिमेचा जन्म झाला , जी नाशिकचा महाविद्यालयामध्ये जाऊन तेथील तरुणांमध्ये संविधानाची जनजागृती करून त्यांना संवैधानिक मुल्य व नैतिकतेचे महत्त्व पटवून देण्याचे काम करत आहे, तसेच नवीन मतदारांना मत देण्या आधी आपण ज्याला निवडून देतो आहे ते हात संविधानाचा चांगला वापर करेल का नाही याचा आधी विचार करण्याचे ही आवाहन करीत आहे. समाजासाठी गौरवशाली बाब आहे असे ते म्हणाले कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. जान्हवी झांजे यांनी केले.या वेळी प्रमुख अतिथीनी विद्यार्थ्यांच्या या अभिनव उपक्रमाचे स्वागत करीत, अशा वास्तव वादी आणि लोकांच्या आयुष्याशी निगडित असणार्या मुद्द्यांना आपल्या नाट्या च्या सहाय्याने हाथ घातल्या बद्दल तोंड भरून कौतुक केले, व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत अशीच संविधान जागृती पुढे नेण्याचा सल्ला दिला.
तरुणाने केली मोहिमेची सुरुवात
या मोहिमेची सुरुवात हर्षद सुनिल पगारे या मविप्र विधी महाविद्यालयात शिकणार्या एका विद्यार्थ्याच्या विचारातून झाली असून पथनाट्याचा संघात सुजाता गरूड, साक्षी झेंडे, जागृती काश्मिरे, संजना जगताप, गायत्री दिवे, नेहा चौधरी, श्रुती नाईक, प्रतीक कुकडे, राहुल गवळी, अनुजा बांग, हर्षद पगारे आदींचा समावेश आहे. संविधान जनजागृतीची मोहीम आतापर्यंत जे.डी.सी बिटको कॉलेज नाशिक रोड, के. जे. मेहता हायस्कूल अॅण्ड ई. वाय. फडोल जूनीयर कॉलेज. मविप्र विधी महाविद्यालय अशा विविध ठिकाणी जाऊन, पथनाट्य, गायन, व्याख्यान यांचा माध्यमातून जनजागृती करीत आहे.