Homeक्राईमसतत पैशाची मागणी, शिवीगाळ आणि दहशत माजविणाऱ्या गुन्हेगाराची हत्या

सतत पैशाची मागणी, शिवीगाळ आणि दहशत माजविणाऱ्या गुन्हेगाराची हत्या

अपहरण करून खून करणाऱ्या आठ जणांना दोन दिवसांची पोलिस कोठडी

वणी प्रतिनिधी

दारुचे व्यसन तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या युवका कडून सततची होणारी पैशांची मागणी, शिवीगाळ व दहशत याचा कायमचा बिमोड करण्यासाठी टिटवे, ता. दिंडोरी व परीसरातील नऊ संशयीत आरोपींनी संगनमतकरुन खून करीत निर्जनस्थळी प्रेत खड्डयात पूरुन ठेवल्याची खळबळजनक घटना घडली आहे. वांजुळे येथील युवक हरीश्चन्द्र कचरु शेवरे उर्फ ह-या वय ३६ याचे चार दिवसा पुर्वी आठ जणांनी अपहरण करून खुन केल्याचा प्रकार उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आठ संशयितांना दोन पोलीस कोठडी देण्यात आली.दि.१४ डिसेंबर रोजी मयत हरीश्चन्द्र शेवरे हरवल्याची तक्रार वणी पोलीस ठाण्यात नातेवाईकां कडून देण्यात आली होती.त्या अनुशंगाने वणी पोलीस तपास करीत असतांना टिटवे येथे काही भांडणे झाल्याची कुनकुन पोलिसांना लागली होती.परंतु ज्या टिटवे गांवात मयता बरोबर झालेल्या भांडणाची वाच्यता कुठेच होत नव्हती गावातील कोणीच काही सांगत नव्हते.पोलीसांनी त्याचा तपास लावताना भांडण कोणाचे झाले यात एकाचा नाव पुढे आले गोपनिय माहिती मिळाली असून संशयित इसमांची माहिती घेवून कायझाले आहे याचा शोध घ्या. त्यानंतर संशयितांचा शोध चालु केला असता सदर संशयित इसम हे घरी मिळुनआले नाही. संशयितांचा मोबाईल नंबर प्राप्त घेऊन तांत्रिक तपासावरून व गोपनीय माहिती काढुन चार आरोपीना दीव- दमण येथुन ताब्यात घेतले. वणी पोलीस त्यांना विश्वासात घेवुन चौकशी केली असता ते उडवा उडवीचे उत्तर देत होते.चौकशी अंती वांजुळे गावातील हरीश्चन्द्र शेवरे यास भांडणाची कुरापत काढुन आरोपीतांकडुन जबरदस्तीने पैशाची मागणी करायचा तसेच पैसे न दिल्यास शिवीगाळ व धमकी देत दयायचा म्हणून सदर आरोपीतांना त्याचा त्रास सहन न झाल्याने यातील संशयित आरोपी यांनी तसेच त्यांचे सोबत असणारे आणखी साथीदार यांनी हरी शेवरे यास संपविण्याचा कट रचला. त्यावरून छगन गांगोडे याने हरीश्चंद्र शेवरे यास मोटारसायकलवर बसवून टिटवे गावच्या पुलाजवळ घेवून जावून यातील आरोपीतांनी हरी शेवरे यास लाठया काठया व घातक हत्यारांनी मारहान करून खून केला व पुरावा नष्ट करण्यासाठी प्रेत वारे ते तळयाच्या पाडयावर जाणा-या कच्या रस्त्याच्या खाली एका ओहळाच्या खडडयात प्रेत पुरले होते.याची महिती घेवून सात संशयितांना ताब्यात घेण्यात आले.तसेच एक सं.आरोपी विधीसंघर्षीत असुन एक संशयीत आरोपी सापडलेला नाही.हरिश्चंद्र शेवरे याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याची माहिती पोलीसांनी दिली.संशयित आरोपींना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली.उप विभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे यांच्या मार्गदर्शना खाली सपोनि.निलेश बोडखे व त्यांचे पोलीस कर्मचारी पुढील तपास करीत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

[yop_poll id="2"]
[yop_poll id="1" show_results="1"]

Most Popular

Recent Comments