Homeक्राईमनेर शिवारात बनावट दारूच्या केंद्रावर छापा जिल्हा परिषदेच्या महिला सदस्यासह तिघे फरार

नेर शिवारात बनावट दारूच्या केंद्रावर छापा जिल्हा परिषदेच्या महिला सदस्यासह तिघे फरार

धुळे प्रतिनिधी 

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने धुळे तालुक्यातील महालकाळी (नेर) शिवारात बनावट दारू तयार करण्याच्या केंद्रावर छापा टाकून कारवाई केली आहे. या कारवाई मध्ये 25 लाख 22 हजार 100 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईदरम्यान जिल्हा परिषदेची महिला सदस्य यांच्यासह तिघांनी घटनास्थळावरून पलायन केल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिली आहे.राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला मिळालेल्या गुप्त बातमीच्या अनुषंगाने या विभागाचे अधीक्षक स्वाती काकडे यांच्या समवेत पथकाने महालकाळी शिवारात (नेर) गायत्रीदेवी संजय जयस्वाल यांचे शेत गट नं ३६० मधील पक्के बांधकाम लगतपत्री शेड मध्ये बनावट देशी दारू निर्मितीच्या कारखान्यावर अचानक छापा टाकला. त्या ठिकाणी बनावट देशी दारू (रॉकेट) ९० मिलीचे ३७ हजार ४०० सीलबंद बाटल्या, ५०० लिटर क्षमतेचा तीन प्लास्टिक ड्रम त्यात १३०० लिटर बनावट देशी दारू ब्लेंड, २५० लिटर क्षमतेचे सहा प्लास्टिक ड्रम त्यात १५०० लिटर स्पिरीट, १००० लिटर क्षमतेचे ४ रिकामे ड्रम त्यात बनावट देशी दारू ब्लैंड वासाचे रसायण, देशी दारू रॉकेट प्रवरा नगर लेबल असलेले बनावट ३२५ पुठ्ठे , देशी दारू रॉकेट प्रवरा नगर छपाई असलेले बनावट ४२ हजार पत्री बुचे, देशी दारू रॉकेट प्रवरा नगर छपाई असलेले बनावट ४ हजार लेबल, ९० मिली क्षमतेच्या एकूण २४ हजार ५०० रिकाम्या प्लास्टिक बाटल्या, मद्य बाटलीस पत्री बुच सिलबंद करण्याचे एक कॅपिंग मशीन, एक इलेक्ट्रिक ब्लेंड मिक्सर , एक इलेक्ट्रिक जनरेटर, एकूण ४९ प्लास्टिक ट्रे, हायड्रोमीटर थर्मामीटर, डिंक बाटल्या, एक दुचाकी स्कूटर, चार प्लास्टिक नरसाळे, इत्यादी, असा एकूण रु. २५,लाख २२ हजार १०० रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या घटना स्थळावरून जिल्हा परिषदेच्या सदस्य गायत्रीदेवी संजय जयस्वाल, सुमित उर्फ गणेश संजय जयस्वाल आणि स्वप्नील उर्फ लाला संजय जयस्वाल हे पळून गेल्याची माहिती देखील राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिली आहे. ही कारवाई परळी पथकाचे निरीक्षक डी.एल. दिंडकर , आर. आर. धनवटे, लीलाधर पाटील दुय्यम निरीक्षक सचिन शिंदे, सौरभ आवटे, पी.बी. अहिरराव, श्रीमती शुभांगी मोरे, सागर नलावडे , रियाज शेख , ए बी निकुंबे, जितेंद्र फुलपगारे, जवान धुळेकर, पावरा, मोरे, अहिरराव, सोनवणे, शेलार, पाटील, शिरसाळे, अस्वले, पानसरे, गाडे, आण्णा बहिरम, पालवी, वाहन चालक विजय नाहीदे,  बी पाटील, यांच्या पथकाने कारवाई केली आहे. जनतेस आवाहन करण्यात येते कि अवैध मद्य निर्मिती, विक्री व वाहतूक संबंधी कोणतेही माहिती अथवा तक्रार असल्यास राज्य उत्पादन शुल्क विभागाचा टोल फ्री क्रमांक १८००२३३९९९९ व व्हाट्सअप नं ८४२२००११३३ यां क्रमांकावर संपर्क साधावा, माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवून त्यास योग्य ते बक्षीस देण्यात येईल. असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाने केले आहे

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

[yop_poll id="2"]
[yop_poll id="1" show_results="1"]

Most Popular

Recent Comments