सुरगाणा प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरगाणा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राहुल मोरे यांनी सुरगाणा पोलिस ठाण्याच्या हद्दीत चालणार्या अवैद्य धंद्यांच्या विरोधात कडक व धडाकेबाज कारवाई मोहिम हाती घेतली आहे.या मोहिमे अंतर्गत त्यांनी गावठी अवैध हातभट्टीचे अड्यांवर धाड टाकुन अड्डे उध्दवस्त करत मुद्देमाल जप्त केला. यामुळे अवैध धंदे करणारांचे धाबे दणाणले आहेत. तर जनतेतुन या कारवाईचे स्वागत केले जात आहे.यासंदर्भात सुरगाणा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सुरगाणा पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेञात असलेल्या कांही गावात अवैधरित्या व छुप्या मार्गाने हातभट्टी दारू सह इतर अवैध धंदे चालत होते. या अवैध धंदे करणारांना हे धंदे बंद करण्याचे सांगुनही त्यांनी आपले धंदे चालुच ठेवले होते.सध्या विधानसभा निवडणुकीचा कालावधी चालु असुन, निवडणुक काळात अवैध धंद्यामुळे कायदा सुव्यवस्थेवर कोणताही परिणाम होऊ नये, यामुळे नागरिकांना ञास होऊ नये. म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अप्पर पोलीस अधिक्षक आदित्य मिरखेलकर उपविभागीय पोलिस अधिकारी किरणकुमार सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरगाणा पोलिस ठाण्याचे पो नि राहुल मोरे यांनी अवैध धंद्यांच्या विरोधात कडक कारवाई मोहिम हाती घेतली या मोहिमे अंतर्गत त्यांनी हद्दीतील बोरगांव शिवारात राजरोसपणे चालणार्या अवैध हात भट्ट्यांवर छापे टाकून अड्डे उध्दवस्त करत सुमारे ऐकविस हजार रूपयांचा मुद्देमाल नष्ट केला. तसेच हे आड्डे चालणा-यांवर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात आले.सुरगाणा पोलिसांच्या या कारवाईने अवैध धंदे करणारांचे धाबे दणाणले असुन, त्यांनी याची धास्ती घेतल्याचे दिसुन येते. या कारवाईत साहय्यक पोलिस निरीक्षक गावित. पो.ह. चेतन बागुल, पो. शि. कैलास मानकर, रमेश चव्हाण, जगदीश घुटे, यांच्यासह त्यांच्या सहकार्यांनी सहभागी होत कारवाई केली.