असा दाखल झाला गुन्हा
या घटनेबाबत बजरंग दल विश्व हिंदू परिषद व हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी ही बाब पोलिसांच्या निदर्शनास आणून दिली. अंबड एमआयडीसी पोलीस चौकी येथे भाजपा प्रदेश प्रवक्ते प्रदीप पेशकार यांच्या नेतृत्वाखाली, बजरंग दल कार्यकर्ते पदाधिकारी श्रीकांत क्षत्रिय विजय चव्हाण गौरव पवार आदींच्या मदतीने आणि स्थानिक कार्यकर्ते सदर गुन्हा नोंद करण्यास पोलिसांना विनंती केली. त्यानंतर गुन्हा दाखल झाला.
पैशाचे आमीष दाखवून तरूणाचे धर्मातर करण्याचे प्रयत्न
सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल
नाशिक प्रतिनिधी
पैशाचे आमीष दाखवून एका महिलेसह तिच्या साथीदारांनी मोलमजुरी करणा-या तरूणास धर्मातर कर असे सांगितल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. औद्योगिक वसाहतीत घडलेल्या घटनेबाबत अंबड पोलिस ठाण्यात या प्रकरणी सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहन राधाकिसन म्हस्के यांनी तक्रार दिली आहे. म्हसे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शनिवारी दुपारी साडेअकरा वाजता अंबड येथील घरकुल योजनेच्या बिल्डींगच्या खाली मी बसलेलो असतांना ज्योती गुरूदेव मोरे या महिलेने पैशाचे आमीष दाखवून धर्मांतर करावे असे सांगितले. तसेच सदर महीला व तीच्या साथिदारांनी ख्रिश्चन धर्मांतर करण्याचे सांगून माझ्या धार्मिक श्रध्दांचा अपमान करून माझ्या धार्मिक भावना दुखावल्याचे म्हटले आहे. या तक्रारीवरुन देविदास जगत पंडोले, आकाश गजानन कांबळे, गुरूदेव सुभाष मोरे, प्रियंका कल्याणपुरी गोस्वामी, रेखा गुलाब अमोदे, ज्योती गुरूदेव मोरे रा. अंबड यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
RELATED ARTICLES
Recent Comments