Homeताज्या बातम्यापंतप्रधान मोदी यांना राज्यातील बहुतांश लोकसभा सदस्यांची सर्वाधिक पसंती- प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे

पंतप्रधान मोदी यांना राज्यातील बहुतांश लोकसभा सदस्यांची सर्वाधिक पसंती- प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे

धुळे लोकसभा मतदारसंघातून डॉ. भामरे की दिघावकर?

धुळे प्रतिनिधी

भारतीय जनता पार्टीच्या संपर्क अभियान अंतर्गत आतापर्यंत राज्यात 34 लोकसभा क्षेत्रामधील दौरा केला आहे. यात 42 हजार लोकांची संपर्क केल्यानंतर अवघ्या 16 जण सोडले तर उर्वरित सर्वांनी एका सुरात 2024 मध्ये पंतप्रधान पदावर नरेंद्र मोदी यांनाच समर्थन दिले आहे. त्यामुळे देशात पुन्हा 2024 मध्ये तिसऱ्या वेळेस पंतप्रधान पदावर नरेंद्र मोदी हेच विराजमान होणार असल्याचे प्रतिपादन आज भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी धुळ्यात केले आहे. यावेळी पुढील खासदार पदावर डॉक्टर सुभाष भामरे यांना मतदार मतदान देतील, असे सांगत असतानाच सेवानिवृत्त पोलीस अधिकारी प्रताप दिघावकर यांच्या नशिबात असेल तर त्यांना देखील खासदारकी मिळू शकते ,असे सांगून त्यांनी संभ्रम निर्माण केला. धुळ्यात आज भारतीय जनता पार्टीच्या संपर्क अभियान अंतर्गत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी हुडको परिसरातील जनते समवेत संवाद साधला. यानंतर भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा कार्यालयाच्या बांधकामाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांच्या समवेत पक्षाचे महामंत्री विजय चौधरी, जिल्ह्याच्या प्रभारी स्मिताताई वाघ, खासदार डॉक्टर सुभाष भामरे ,माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, धुळे शहर विधानसभा प्रमुख अनुप अग्रवाल, शहर महानगर प्रमुख गजेंद्र अंपळकर, महापौर प्रतिभाताई चौधरी ,सेवानिवृत्त पोलीस अधिकारी प्रतापराव दिघावकर ,जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अश्विनीताई पाटील, जिल्हा परिषदेच्या सभापती संजीवनी सिसोदे, डॉक्टर माधुरी बाफना, माजी महापौर जयश्रीताई अहिरराव यांच्यासह भारतीय जनता पार्टीसाठी सुमारे साडेचार कोटी रुपयांची जागा दान देणारे गजेंद्र अंपळकर यांचा परिवार या मंचावर उपस्थित होते. प्रास्ताविक करत असताना अंपळकर यांनी हर हर महादेव व्यायाम शाळेसाठी दीड कोटी रुपये खासदार भामरे यांनी केंद्र सरकारकडून उपलब्ध करून दिल्याची माहिती देत असतानाच दसेरा मैदान चौकातील भूमाफियांनी हडप केलेली जागा मिळवण्यात यश आले. तसेच पाच कंदील चौकातील कॉम्प्लेक्स उभे करण्याचा मार्ग देखील मोकळा झाल्याची माहिती दिली. यानंतर बोलत असताना महामंत्री विजय चौधरी यांनी इंडिया आघाडीवर टीका केली .अलीबाबा आणि चाळीस चोर असलेले देश विघातक शक्तींना मदत करत असल्याची टीका त्यांनी केली. बलशाही भारत तसेच दहशत मुक्त भारत होतो आहे. त्यामुळे राज्यात 45 पेक्षा जास्त खासदार येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर बोलत असताना प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोरोना काळात जनतेला धुळेकर जनतेला आपला परिवार म्हणून सांभाळणारे तसेच संक्रमण काळात उत्कृष्ट काम करणारे तत्कालीन महानगर जिल्हाध्यक्ष तथा शहर विधानसभा प्रमुख अनुप अग्रवाल यांचे काम प्रशंसानीय असल्याचे कौतुक केले .तर पक्षासाठी समर्पण भावनेने कोट्यवधी रुपयाची जागा देणाऱ्या अंपळकर परिवाराचा देखील गौरव केला. या जागेवर अत्याधुनिक भाजपा कार्यालय उभे राहणार असून त्यासाठी निधी कमी पडू देणार नाही असे त्यांनी सांगितले. राज्यात 12 कार्यालयाचे बांधकाम सुरू असल्याची माहिती देखील त्यांनी दिली. भारतीय जनता पार्टीच्या संपर्क अभियान अंतर्गत 34 व्या लोकसभेला आपण भेट दिली असून पुढील पंधरा दिवसात अन्य लोकसभा क्षेत्रांना देखील भेटी देणार असल्याचे त्यांनी सांगितले. आतापर्यंत 42 हजार लोकांबरोबर संवाद साधला असून यातील अवघे 16 सोडले तर सर्वांनी एका सुरात 2024 मध्ये पंतप्रधान मोदी हेच हवे ,असे स्पष्ट केले. काश्मीरच्या प्रश्नावरून काँग्रेसने गेल्या 65 वर्षात दोन विधान ,दोन प्रधान आणि दोन निशाण असे धोरण राबवले .मात्र पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने निर्णय घेऊन 370 कलम हटवले .त्यामुळे एक विधान आणि एक प्रधान ही बाब प्रत्यक्षात घडून आली. त्यामुळे काश्मीरच्या लाल चौकामध्ये तिरंगा डौलाने फडकतो आहे. गेल्या पन्नास वर्षात काश्मीरमध्ये 18 लाख पर्यटक गेले. मात्र या एकाच वर्षात एक कोटी 82 लाख पर्यटकांनी भेटी देऊन लाल चौकातील तिरंग्याला सलाम केल्याचा दावा यावेळी बावनकुळे यांनी केला. 22 जानेवारी रोजी देशात मोठी दिवाळी साजरी होणार आहे. राम मंदिर सर्वांसाठी खुले होणार आहे. त्यामुळे जनतेला खासदार भामरे यांनी राम लल्लाच्या दर्शनाची सुविधा उपलब्ध करून द्यावी असेही त्यांनी सांगितले. केंद्रातील भारतीय जनता पार्टीच्या सरकारने बहुमत असल्यामुळे अनेक विकासाचे निर्णय घेतले. धुळेकर जनतेने एक मत कमळाला दिल्यामुळे हे परिवर्तन घडू शकले. त्यामुळे भविष्यात देखील भारतीय जनता पार्टीला धुळेकरांची भरभरून प्रतिसाद मिळेल ,असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

खासदारकीच्या उमेदवारीवरून संभ्रम

धुळे लोकसभेत भारतीय जनता पार्टीचे डॉक्टर सुभाष भामरे हे आहेत. आज जनतेला मार्गदर्शन करत असताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक मत भारतीय जनता पार्टीला दिल्यामुळे परिवर्तन झाल्याचे सांगत असतानाच यापुढील काळात देखील डॉक्टर सुभाष भामरे यांना जनता भरभरून प्रतिसाद देईल, असे सांगितले .मात्र त्यानंतर सेवानिवृत्त पोलीस अधिकारी प्रतापराव दिखावकर हे मंचावर उपस्थित असल्यामुळे त्यांनी प्रतापराव दिघावकर यांना उद्देशून डॉक्टर भामरे यांचे कार्य सांगितले. तसेच दिघावकर यांच्या नशिबात असेल तर त्यांना देखील खासदारकी मिळू शकते, असे सांगितले. त्यामुळे उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये लोकसभेचे भविष्यातील उमेदवार डॉक्टर भामरे की दिघावकर याबाबतचा संभ्रम मात्र कायम राहिला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

[yop_poll id="2"]
[yop_poll id="1" show_results="1"]

Most Popular

Recent Comments