Homeक्राईमपोलीस अधीक्षक अवैध व्यवसायांविरोधात मैदानात, धुळ्यात २० जणांविरुध्द गुन्हा

पोलीस अधीक्षक अवैध व्यवसायांविरोधात मैदानात, धुळ्यात २० जणांविरुध्द गुन्हा

धुळे प्रतिनिधी

जिल्हा पोलिस अधीक्षकपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर श्रीकांत धिवरे यांनी शुक्रवारी कामकाजास सुरवात केली. त्यांनी सायंकाळनंतर स्वतः अन्य पोलिस अधिकाऱ्यांना सोबत घेत राजकमल टॉकीजमधील एका खोलीत चालणारा जुगारअड्डा आणि नंतर मुंबई-आग्रा महामार्ग पोलिस चौकी परिसरात अवैध स्क्रॅप विक्रेत्यांसह गुदामावर छापा टाकला.  या धडक कारवाईत जुगारअड्ड्यावर १७ लाखांवर, तर अवैध स्क्रॅप व्यवसायाप्रकरणी लाखोंचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती. या कारवाईतून श्री. धिवरे यांनी पहिला दिवस गाजविला.शहरातील बंद राजकमल टॉकीज येथील एका खोलीत लोकेश शालिग्राम सूर्यवंशी व अशोक यशवंत तायडे हा आपल्या देखरेखीखाली ५२ पत्त्यांच्या कॅटवर जुगारअड्डा चालवीत असल्याची माहिती श्री. धिवरे यांना मिळाली. त्यामुळे टाकलेल्या छाप्यात रोकड, जुगाराचे साहित्य, मोबाईल, तसेच मोटारसायकली असा १७ लाख ३५ हजार ६० रुपयांचा मुद्दामाल पोलिस पथकाने जप्त केला.संशयित लोकेश सूर्यवंशी (रा. जुने धुळे) फरारी झाला असून, अशोक तायडे (वय ४५, रा. मनोहर टॉकीजमागे), सूरज भगवान पवार (३६, रा. वाणी मंगल कार्यालयासमोर, चितोड रोड), स्वप्नील प्रभाकर साळवे (३४, रा. वैभवनगर, गोळीबार टेकडीजवळ), जितेंद्र वामन गोपाळ (२७, रा. भाईजीनगर, नवनाथ मंदिराजवळ), नरेंद्र अशोक ईखे (३७, रा. शेलारवाडी, चितोड रोड), धनेंद्र लक्ष्मण जाधव (४०, रा. खेडे, ता. धुळे), जयदीप दयाराम चत्रे (३८, रा. श्रीराम मंगल कार्यालयासमोर, ग.नं. ९, देवपूर), दुर्गेश संजय लोखंडे (२८, रा. ३२, क्वार्टर्स सिव्हिल हॉस्पिटल कॉलनी), बापू हरचंद तमखाने (६९, रा. मच्छीबाजार, मोगलाई), हरेश दिलीप शिंदे (३६, रा. स्वामी दयानंद सोसायटी), मुन्ना इब्राहिम शेख (४९, रा. ग.नं. ४, एकनाथ व्यायामशाळेच्या मागे), संजय आधार गर्दे (४२, रा. ५० खोली, शांतीनगर) यांच्याविरुद्ध आझादनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. कारवाईवेळी स्वतः पोलिस अधीक्षक धिवरे, त्यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, उपनिरीक्षक अमरजित मोरे, प्रकाश पाटील, श्‍याम निकम, दिलीप खोंडे, हवालदार मच्छिंद्र पाटील, रवींद्र माळी, संदीप पाटील, प्रकाश सोनार, सुरेश भालेराव, रविकिरण राठोड, प्रशांत चौधरी, मायुस सोनवणे, प्रल्हाद वाघ, नीलेश पोतदार, राहुल गिरी, गुणवंत पाटील, किशोर पाटील, योगेश साळवे, देवेंद्र ठाकूर, सुशील शेंडे आदींनी कारवाई केली.स्क्रॅपचा अवैध व्यवसाय उद्ध्वस्त पोलिस अधीक्षक धिवरे यांनी जुगारअड्ड्यापाठोपाठ अवैध स्क्रॅप व्यवसायावरील कारवाईकडे मोर्चा वळविला. त्यांनी मोहाडी पोलिस ठाण्यांतर्गत मुंबई-आग्रा महामार्ग पोलिस चौकी परिसरात अवैध स्क्रॅप विक्रेत्यांवर छापा टाकला. त्यात आढळलेल्या सात ते आठ ट्रक या चोरीच्या असल्याचा संशय आहे.गॅस कटरच्या सहाय्याने लोखंड कटींचे काम केले जात होते. विविध भागातील स्क्रॅप विक्रते एकत्र येऊन अवैध स्क्रॅप व्यवसाय करीत असल्याचे आढळले. त्यांचे मोठमोठे गुदाम असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी नऊ जणांवर गुन्हा दाखल केला जात असून, लाखोंचा मुद्देमाल जप्त केल्याचे श्री. धिवरे यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

[yop_poll id="2"]
[yop_poll id="1" show_results="1"]

Most Popular

Recent Comments