Homeताज्या बातम्यामराठी पाट्या लावण्याचा सर्वोच्च निर्देश

मराठी पाट्या लावण्याचा सर्वोच्च निर्देश

मराठी पाट्यांवरून मनसेचे खळखट्याक; पोलिस यंत्रणा अलर्ट

नाशिक प्रतिनिधी

सर्वोच्च न्यायालयाने मुंबईसह राज्यातील व्यापारी संघटनेला दोन महिन्यात दुकानांवर मराठी पाट्या लावण्याचे निर्देश दिले आहेत. मराठी पाट्या लावण्याची २५ नोव्हेंबर अंतिम मुदत आहे. त्यामुळे मुदत संपत असताना मराठी पाट्या लावणार नाहीत, तेथे खळखट्ट्याक करण्याची तयारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आल्याने पोलिस यंत्रणादेखील ‘अलर्ट मोड’मध्ये आली आहे. राज्यात मराठा, धनगर समाजाचे आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. ओबीसी समाजाचेदेखील राज्यात ठिकठिकाणी मेळावे आयोजित केले जात आहे. सोशल मीडियावर शाब्दीक चकमकी घडत असताना सर्वोच्च न्यायालयाने मराठी पाट्यासंदर्भात दिलेली मुदत २५ नोव्हेंबरला पूर्ण होत आहे. तीन दिवस शिल्लक राहिल्याने मनसेकडून तारीख संपत असल्याचे सोशल मीडियावरून व्हायरल केले जात आहे.याचा अर्थ त्यानंतर मनसेकडून आंदोलन केले जाणार आहे. यातून मनसेची खळखट्याक स्टाइलदेखील समोर येवू शकते. आरक्षणासाठी मराठा व धनगर समाजाचे आंदोलन, ओबीसी समाजाचे मेळावे या पार्श्‍वभूमीवर तणावाचे वातावरण असताना या परिस्थितीमध्ये आता मराठी पाट्यांच्या मुद्द्यावरून मनसेकडून आक्रमक भूमिका घेतली जात आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून मनसेकडून २५ नोव्हेंबरला मुदत संपत असल्याचे सांगितले जात आहे. मुंबईत सर्व दुकानांवरील पाट्या २५ नोव्हेंबरपर्यंत मराठीत असाव्यात, असा निर्णय कोर्टाने दिल्याने निर्णयासंदर्भात अल्टिमेटम देणारे बॅनर्स लावले जात आहे. मराठी पाट्यांच्या संदर्भात तीन दिवसांचा कालावधी आता उरला, मराठी पाट्या करा नाहीतर मनसेचा खळखट्याक, असा मजकूर असलेले बॅनर्सवर झळकत आहे. त्यामुळे मराठी पाट्यांचा मुद्दा गाजण्याच्या शक्यतेने पोलिसांकडून सावध पवित्रा घेतला जात आहे.मनसे कार्यालयात बैठकमराठी पाट्या लावण्याची मुदत २५ नोव्हेंबरला संपुष्टात येत आहे. त्यानंतर पक्षाची भूमिका ठरविण्यासाठी मनसेच्या राजगड कार्यालयात गुरुवारी (ता. २३) बैठक बोलाविण्यात आल्याची माहिती मनसेचे शहराध्यक्ष सुदाम कोंबडे यांनी दिली. बैठकीनंतर मराठी पाट्यांच्या आंदोलनासंदर्भात निर्णय घेतला जाईल.

“न्यायालयाच्या निर्णयानुसार २५ नोव्हेंबरला मुदत संपुष्टात येत आहे. त्यामुळे मराठीमध्ये पाट्या लागल्या पाहिजेत. जे पाट्या लावणार नाही तेथे मनसे स्टाईलने आंदोलन करावेच लागेल.” – सुदाम कोंबडे, शहराध्यक्ष मनसे.

“मनसेच्या दीर्घ आंदोलनानंतर मराठी भाषेत पाट्या लागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आता कायद्यानुसार तरी पाट्या लावा अन्यथा खळखट्याक शिवाय पर्याय राहणार नाही.” – श्याम गोहाड, उपाध्यक्ष, म्युनिसिपल कामगार सेना.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

[yop_poll id="2"]
[yop_poll id="1" show_results="1"]

Most Popular

Recent Comments