Homeक्राईमलोखंडेवाडी शिवारात युवकाचा खून

लोखंडेवाडी शिवारात युवकाचा खून

वणी प्रतिनिधी

वणी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दिंडोरी तालुक्यातील लोखंडेवाडी शिवारातील पालखेड धरणाचे भरावाच्या बाजुला खडकजांब, ता. चांदवड येथील एका युवकाचा अज्ञात मारेकऱ्याने धारदार तीक्ष्ण हत्याराने तोंडावर व अन्य भागावर वार करुन खून केेेल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत वणी पोलिस ठाण्यात रात्री उशिराने खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वणी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील लोखंडेवाडी शिवारात असलेल्या पालखेड धरणाकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर व धरणाचे आतील पाण्याचे बाजुचे भरावाचे दगडांवर ता. २१ नोव्हेंबर २०२३ रोजी दुपारी ३ ते ता. २२ नोव्हेंबर २०२३ रोजीचे दुपारी २ वाजेचे दरम्यान किशोर दगु उशीर, वय २६ वर्षे, राहणार खडकजांब ता. चांदवड यास अज्ञात मारेकरी आरोपीने कोणत्यातरी धारदार हत्याराने कपाळावर गंभीर खोलवर वार करून गंभीर जखम करून, तोंडावा जबड्याला, दोन्ही डोळ्यांना, चेहऱ्यावर, गालावर, डोक्यावर गंभीर वार करून त्याचा खुन केला. व मयताचा मृतदेह लोखंडेवाडी शिवार पालखेड धरणाचे भरावाच्या आतील पाण्याचे बाजुचे भरावाच्या दगडांवर ओढत नेवुन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. याबाबत सुरेश सुधाकर कांडेकर, वय ३९ रा. खडकजांब (मयताचे नातेेेेेवाईक) यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात मारेकऱ्याविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान मयतास येथील पोलिसांनी येथील ग्रामिण रुग्णालयात रात्री शवविच्छेदनासाठी आणण्यात आले होते. मात्र नातेवाईकांच्या मागणीनूसार मृतदेह नाही नाशिक येथे फॉरेन्सिक ओपिनियन साठी पाठविण्यात आले आहे. याबाबत सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश बोडखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक महेश शिंदे अधिक तपास करीत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

[yop_poll id="2"]
[yop_poll id="1" show_results="1"]

Most Popular

Recent Comments