Homeक्राईमकत्तलखोरांच्या तावडीतून १७ जनावरांची सुटका

कत्तलखोरांच्या तावडीतून १७ जनावरांची सुटका

वणी पोलिसांची पोलिसांची धडक कारवाई

वणी प्रतिनिधी 

खेडगांव शिवारात अवैधरित्या कत्तलीसाठी व वाहतुक करण्याच्या उद्देशाने चारापाणी न करता क्रुरपणे बांधून ठेवलेल्या १७ जनावरांची वणी पोलिसांनी सुटका केली आहे. याप्रकरणी तीघा संशयीतांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. खेडगांव येथे बुधवार, ता. २२ रोजी मध्यरात्री १ वाजेच्या दरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्राच्या संंरक्षक भितींच्या बाहेरील बाजूस व संतोष लोंढे याचे घरासमोर मोकळे जागी गोवंश जातीचे १० गो-हे व ७ गायी असे १७ जनावरे अवैधरित्या कत्तलीसाठी व वाहतुक करणेचे उद्देषाने जनावरांना क्रुरपणे वागणुक देवुन त्याची चारापाणीची व्यवस्था न करता छळ करून बांधून ठेवलेली पोलिसांना आढळली. सदर जनावरांची बाजारभावानूसार १ लाख ९८ हजार इतकी असून याप्रकरणी पोलीस हवालदार पुरुषोत्तम रघुनाथ शेलार यांच्या फिर्यादीवरुन संतोष गंगाधर लोंढे, अनिल प्रभाकर ठुबे, मोहम्मद सैय्यद सर्व रा. खेडगांव यांच्या विरुध्द प्राण्याचा छळ प्रतिबंध व महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी जप्त केलेली जनावरांची पशुवैद्यकिय अधिकाऱ्यामार्फत तपासणी करुन संगोपणासाठी वणी येथील श्रीकृष्ण गोशाळेत दाखल केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

[yop_poll id="2"]
[yop_poll id="1" show_results="1"]

Most Popular

Recent Comments