Homeताज्या बातम्याप्लास्टिक, थर्माकोलने घेतली पळसाच्या पत्रावळीची जागा

प्लास्टिक, थर्माकोलने घेतली पळसाच्या पत्रावळीची जागा

आरोग्यासोबत स्थानिक रोजगारही आला धोक्यात

बोरगांव प्रतिनिधी 

विवाह सोहळा, सप्ताह, पूजा व इतर सार्वजनिक कार्यक्रमात जेवणासाठी मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या पळसाच्या पानांच्या पत्रावळी सध्याच्या काळात हद्दपार झाल्याचे चित्र ग्रामीण भागात न पहायला मिळत आहे. आधुनिक युगातही प्लास्टिक व थर्माकोलच्या या पत्रावळींना अधिक पसंती मिळत आहे.
ग्रामीण भागातील विवाह सोहळ्यात व इतर सार्वजनिक कार्यक्रमात आता पळसाच्या पानांच्या न पत्रावळींची जागा थर्माकोलने व न प्लास्टिक पत्रावळीने घेतली आहे. त्यामुळे स्थानिकांचे पत्रावळी तयार करणे व पळसाची पाने जंगलातूनच आणून व्यापाऱ्यांना विक्री करणे हा छोटेखानी रोजगार देणारा व्यवसाय कमी होऊ लागला आहे. पुरातन काळापासून मंगल कार्याच्या समारंभासाठी जेवणाच्या वेळी पळसाच्या पानांपासून बनविलेल्या पत्रावळींचा वापर केला जात असे. परंतु, आयुर्वेदिक गुणधर्म असलेली पत्रावळी सध्या लोप पावत आहे. परिणामी, जंगल परिसरातील स्थानिकांची रोजगाराची साधनेही बंद झाली आहे. पळसाच्या पानांची पत्रावळी शिवण्यासाठी लिंबा- वड्याच्या झाडाच्या काडीचा वापर होत असे. लिंबाच्या झाडाला आयुर्वेदात मोठे महत्त्व आहे. पळसाच्या पानांना कीड लागत नाही. या पत्रावळी स्वस्तात सहज उपलब्ध होत होत्या. एखाद्या कार्यक्रमात आलेल्या पाहुण्यांना ताटात जेवण न देता पत्रावळीवर सामुदायिक जेवण दिले जात होते. मात्र, सध्या आधुनिकीक- रणाच्या युगात ग्रामस्थ पळसाच्या पानांएवजी प्लास्टिक किंवा थर्मोकोलच्या पत्रावळीचा वापर करताना दिसत आहेत. त्यामुळे स्वस्त व आयुर्वेदिक महत्व असणारी पळसाची पत्रावळी हद्दपार झाली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

[yop_poll id="2"]
[yop_poll id="1" show_results="1"]

Most Popular

Recent Comments