Homeताज्या बातम्याजिल्ह्यात अवैध दारू विक्री जोमात, राज्य उत्पादन शुल्कचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष!

जिल्ह्यात अवैध दारू विक्री जोमात, राज्य उत्पादन शुल्कचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष!

प्रशांत कोठावदे / सटाणा
जिल्ह्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री जोमात सुरू आहे. याकडे राज्य उत्पादन शुल्क कानाडोळा करत असल्यामुळे नागरिकांत मात्र असंतोषाचे वातावरण तयार होत आहे. गावात सकाळपासून रात्री उशिरापर्यंत खुलेआम देशी दारूची विक्री केली जाते. कामगार व युवकांना दारूचे व्यसन जडले आहे. दारूला ग्राहक चांगला असल्यामुळे तसेच आर्थिक उत्पन्नही मोठ्या प्रमाणात मिळत असल्यामुळे अनेकांनी या व्यवसायात उडी घेतली आहे. मद्यपी मद्य प्राशन करून सार्वजिनक ठिकाणी गोंधळ घालत अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत असल्याने रस्त्याने ये-जा करणार्‍या महिला, कामगार, विद्यार्थी व वाहनधारकांना त्रास सहन करावा लागतो. तर महिला व मुलींची छेड काढण्याचा प्रयत्न दारुडे करतात. हा प्रकार सुरू असताना किंवा त्यानंतर तक्रार देण्यास कुणी पुढे येत नसल्यामुळे मद्यपींचा त्रास वाढला आहे. कामगार व युवक दारूच्या व्यसनात गुरफटल्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले आहे. व्यसन करणार्‍यांच्या घरात भांडणाचे प्रकार वाढले असून दारूची चोरटी विक्रीही सुरू आहे. ही होणारी दारूची चोरटी विक्री थांबविण्यासाठी कुणीही पुढाकार घेत नसल्यामुळे नागरिकांत नाराजीचा सूर उमटत आहे. मिळेल त्या ठिकाणी रोजंदारी करून आलेली मजुरी कामगार दारूवर खर्च करत आहेत.सटाणा, कळवण,अभोणा, दिंडोरी,देवळा, सुरगाणा, पेठ, तालुक्यात दारू विक्री करणार्‍यांची दहशत असल्यामुळे त्यांच्या विरोधात तक्रार करण्यास सर्वसामान्य नागरिक धजावत नाही. यामुळे दारू विक्रीचा हा व्यवसाय खुलेआम सुरू आहे. ठिकठिकाणी खुलेआमे अवैध दारूची विक्री जोमात सुरू आहे. दारू विक्रेत्यांकडून ‘मलिदा’ मिळत असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी व कर्मचारी कानाडोळा करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.त्यामुळे गावातील अनेक तरुणांसह मोल मजुरी करणाऱ्यांना व्यसन जडल्याने कौटुंबिक कलह वाढले आहेत.

दारू तस्करीकडे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुर्लक्ष
नाशिक जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना अवैध दारू वाहतूक, तस्करी, विक्री करणाऱ्या दारू माफियावर लक्ष नसल्याचे दिसून येत आहे. गुजरात राज्यात दारू बंदी असल्याने गुजरात महाराष्ट्र सीमावर्ती भागात असलेल्या सुरगाणा पेठ कळवण नवापूर तालुक्यातून मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी होते. याकडे वरिष्ठांना लक्ष देणे गरजेचे आहे.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

[yop_poll id="2"]
[yop_poll id="1" show_results="1"]

Most Popular

Recent Comments