Homeराजकारणजिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाचा उपक्रम, गरीब असलेल्या २८ कुटुंबांना मदत, कुपोषण कमी...

जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाचा उपक्रम, गरीब असलेल्या २८ कुटुंबांना मदत, कुपोषण कमी करण्यासाठी कोंबड्यांचे वाटप

जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाचा उपक्रम, गरीब असलेल्या २८ कुटुंबांना मदत,
कुपोषण कमी करण्यासाठी कोंबड्यांचे वाटप

विशेष प्रतिनिधी । बोरगाव

कुपोषण कमी करण्यासाठी सुरगाणा या आकांक्षित तालुक्यातील कुपोषित बालकांच्या पालकांना २५ कोंबड्या व ३ कोंबडे असे एकूण २८ कोंबड्यांचे वाटप करण्यात आले. या कोंबड्यांच्या अंडीपासून कुपोषित बालकांना प्रथिनयुक्त आहार मिळणार असून उर्वरीत अंडीच्या विक्रीतून उत्पन्न मिळणार आहे. तालुक्यातील ३४ कुटुंबांना ९५२ कोंबड्यांचे वाटप करण्यात आले. एकात्मिक बालविकास सेवा योजना व जिल्हा पशुसंवर्धन कार्यालयाच्या समन्वयाने ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.
आकांक्षीत तालुका सुरगाण्यातील कुपोषण कमी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सेस निधीतून २०२३-२४ साठी ही योजना राबवण्यात आली. यात २५ मादी कोंबड्या व ३ नर कोंबड्यांसह त्यांच्या खाद्याचा समावेश आहे. आमदार नितीन पवार यांच्या हस्ते कुपोषित बालकांच्या पालकांना वाटप करण्यात आले. कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना राबवण्यात येत असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय शिंदे यांनी दिली. कुपोषित बालकांच्या पालकांना कोंबड्याचे वाटप करून त्यातून मिळणाऱ्या अंडीद्वारे लाभार्थ्यांना प्रथिनयुक्त आहार मिळावा व उरलेल्या अंड्यातून त्यांना रोजगार मिळून आर्थिक लाभ व्हावा, हे उद्दिष्ट ठेवून ही योजना राबवण्यात येत आहे.
लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन अधिकाधिक कोंबडी व अंडी उत्पादन करावे, कोंबड्यांचे योग्य संगोपन करून त्यातून पिल्लांची पैदास करून कुक्कुटपालन व्यवसाय कसा वाढीस लागेल यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन आमदार पवार यांनी केले, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय शिंदे यांनी या नावीन्यपूर्ण योजनेबद्दल लाभाथ्यर्थ्यांना माहिती दिली. यावेळी एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रताप पाटील, बालविकास प्रकल्प अधिकारी संजय कोंढार व अर्जुन झरेकर, सुरगाणा गटविकास अधिकारी महेश पोतदार, तालुका वैद्यकीय अधिकारी दिलीप रणवीर उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

[yop_poll id="2"]
[yop_poll id="1" show_results="1"]

Most Popular

Recent Comments