HomeUncategorizedअतिदुर्गम भागातील पिंपळसोंड शाळेतील विद्यार्थ्यांनी साकारला जलदुर्ग किल्ला.

अतिदुर्गम भागातील पिंपळसोंड शाळेतील विद्यार्थ्यांनी साकारला जलदुर्ग किल्ला.

प्रतिनिधी | सुरगाणा 
सुरगाणा तालुक्यातील गुजरात सीमेवरील पिंपळसोंड येथील जिल्हा परिषद शाळेचे उपक्रमशील शिक्षक प्रविण पवार यांच्या मार्गदर्शनाने शिवजयंती निमित्ताने जलदुर्ग किल्ल्याची प्रतिकृती शाळेच्या चिमुकल्यांच्या हातांनी जलदुर्ग किल्ल्याची सुंदर प्रतिकृती साकारली. प्रतिकृती साकारताना विटा, चुना, दगड, वाळू, माती, गायीचे शेणाचा वापर करत पर्यावरण पूरक जलदुर्ग किल्ला उभारुन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले.
जयंती निमित्त शाळेतील विद्यार्थी कृषाली रेंजर, आशिष खाडम, मीनाक्षी कडाळी, नितीन कुंवर, हर्षद बागूल, योगेंद्र खोटरे यांनी प्रविण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा किल्ला तयार केला. किल्ला बघण्यासाठी गावातील लोकांनी उपस्थिती लावली. जलदुर्ग किल्ल्याची हुबेहूब प्रतिकृती उभारण्यात आल्याने पालकांनी शाळेत येऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले. शिवजयंती निमित्ताने मुख्याध्यापक रवींद्र भोये, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा नंदा बागूल, ग्रामपंचायत सदस्या उषा खोटरे, तुळशीराम खोटरे उपस्थित होते. शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथा, पराक्रमाचे गड किल्ले हेच खरे साक्षीदार असून त्यांचे जतन व संवर्धन करायला हवे, असा संदेश विद्यार्थ्यांना शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने जलदुर्ग किल्ला तयार करत दिला.
फोटो- सुरगाण्यातील पिंपळसोंड शाळेतील विद्यार्थ्यांनी शिवजयंती निमित्ताने साकारलेली जलदुर्ग किल्ल्याची प्रतिकृती.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

[yop_poll id="2"]
[yop_poll id="1" show_results="1"]

Most Popular

Recent Comments