Homeताज्या बातम्याकोडीपाडा येथे बिबट्याच्या हल्ल्यात बकरी जखमी, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

कोडीपाडा येथे बिबट्याच्या हल्ल्यात बकरी जखमी, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

नामदेव पाडवी / ठाणगाव 

नाशिक जिल्ह्यातल्या सुरगाणा तालुक्यातील बाऱ्हे परिसरात बिबट्याचा चांगलाच धुमाकूळ सुरू आहे. मागील आठवड्यात ठाणगाव शिवारातील कोडीपाडा  खिराटमाळ रस्त्यावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना रविवारी रात्री आठच्या दरम्यान घडली होती. प्रल्हाद हंसराज महाले (१६, रा. कोडीपाडा) असे या जखमी युवकाचे नाव आहे. तो ठाणगाव येथील जय योगेश्वर माध्यमिक विद्यालयात दहावीत शिकत आहे. प्रल्हाद महाले शेतात गेला होता. तो रात्री आठला घरी परतत असताना शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर झडप घालत गुडघ्याच्या खाली पंजा मारून जखमी केले होते. ही घटना ताजी असताना कोडीपाडा (ठाणगाव) येथील शेतकरी सुरेश महाले यांच्या मालकीच्या शेतात शेळ्या चारत असताना संध्याकाळी पाचच्या सुमारास बकरीवर मानेच्या खाली बिबट्याने हल्ला करून जखमी केले. दिवसेंदिवस बाऱ्हे वनपरिक्षेत्रात बिबट्याचे दर्शन होत असते. यासंदर्भात वनविभागाला कळविले असता, बाऱ्हे वनपरिक्षेत्र अधिकारी सुधीर कवर यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल माया म्हस्के, वनरक्षक लक्ष्मण घटका यांनी त्या जागेवर पिंजरा लावला. परंतू पिंजरा लावूनही पिंजऱ्यात बिबट्या येत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आतापर्यंत अनेक शेतकऱ्यांचे लहान – मोठे प्राण्यांचे बळी गेले आहेत. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

[yop_poll id="2"]
[yop_poll id="1" show_results="1"]

Most Popular

Recent Comments