Homeताज्या बातम्याजन्म मृत्यूच्या अर्जाची मनपाकडून काळ्याबाजाराप्रमाणे विक्री 

जन्म मृत्यूच्या अर्जाची मनपाकडून काळ्याबाजाराप्रमाणे विक्री 

दोन रुपयांत झेरॉक्स अर्ज , प्रशासनाची बघ्याची भूमिका

संदिपकुमार ब्रह्मेचा / नाशिक 

दैनंदिन वापरात लागणारी स्टेशनरी , पावती पुस्तके, बील बुक महापालिकेकडून छपाई करून घेण्यात येत असली जन्म आणि मृत्यू दाखल्याच्या अर्जाची छपाईचं केलेली नसल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे जन्म मृत्यूचा दाखला मिळण्यासाठीचा अर्जाची चक्क काळा बाजाराप्रमाणे परस्पर विक्री होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. तत्कालीन मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी महापालिकेला विभागीय स्तरावर लागणाऱ्या सर्व स्टेशनरी छपाईची यादी २०१९ मध्ये तयार केली असली तरी त्यात दाखला मागणी अर्जाची छपाई महापालिकेकडून केली जात नसल्याचे स्पष्ट होत आहे, याशिवाय याचा अर्जापोटी महापालिकेला मिळणारे लाखोंच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागत आहे. पश्चिम विभागीय कार्यालयात शहरातील रुग्णालयाकडून जन्माची नोंद आल्यानंतर झेरॉक्स केलेला व महापालिकेचे नम्बरिंग नसलेला एक फॉर्म नागरिकाला दोन रुपये देऊन विकत घ्यावा लागतो . त्यानंतर दाखला मिळण्यासाठी हा फॉर्म भरून दिल्यानंतर ई- सुविधा केंद्रात ई-पाससाठी पाच रुपये भरून दिल्यानंतर महापालिकेची अधिकृत पाच रुपये भरल्याचा पास मिळतो आणि हाच पास जमा केल्यानंतर अर्जदाराला दाखला मिळतो. तर मृत्यूचा दाखला मिळण्यासाठी मृत व्यक्तीची रीतसर नोंद अंतिम संस्काराच्या वेळी स्मशानभूमीत केली जाते. त्यानंतर ही नोंद त्या त्या विभागीय कार्यालयात येते. विभागीय कार्यालयात आलेल्या नोंदी जन्म मृत्यू रजिस्ट्रार केंद्राच्या वेबसाईटवर नोंद झाल्यावर त्याचा वेबसाईटवर दाखला तयार होतो. हाच मृत्यूचा दाखला घ्यावयाचा असल्यास दोन रुपयांचा ( झेरॉक्स ) अर्ज विकत घ्यावा लागतो.  त्यानंतर ई – सुविधा केंद्रातून पाच रुपयाचा भरणा केल्यावर ई- पास दिला जातो याच ई- पासवर दाखला नागरिकाला दिला जातो. महापालिकेची सहा विभागीय कार्यालये असली तरी एकही विभागीय कार्यालयात छापील अर्ज मिळत नसल्याने याच अर्जाची विक्री काळ्याबाजारातून होत आहे. पश्चिम विभागीय कार्यालयात अगदी बिनदिक्कत पणे हा झेरॉक्स अर्ज एक खिडकी योजनेतून दिला जातो तर पंचवटी विभागीय कार्यालयाच्या समोर असलेल्या झेरॉक्स दुकानात महापालिकेचे अर्ज विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचे कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येते. त्यामुळे गेल्या चार ते पाच वर्षात महापालिकेला मोठ्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागले आहे. त्यामुळे आता तरी महापालिका प्रशासनाचे डोळे उघडणार का ? हा असा प्रश्न उपस्थित होत आहे.

वरिष्ठांकडून भेटीचा देखावा ? 

मनपा आयुक्त , अतिरिक्त आयुक्त , उपायुक्त असे तिन्ही वरिष्ठ अधिकारी विभागीय कार्यालयांना अचानक भेटी देत असतात असे असतांना देखील झेरॉक्स अर्जाची विक्री होत असल्याचे या वरिष्ठ अधिकाऱ्यांना निदर्शनास आले नाही हे विशेष. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अशा विभागीय कार्यालयांना असलेल्या भेटी देखील केवळ देखावा करण्यासाठी आहेत का असा सवाल उपस्थित होतो. 

अर्जाचा खेळ कशासाठी

जन्म मृत्यूची नोंद ही गेल्या काही वर्षांत अतिशय महत्त्वाची मानली जात असली तरी त्यासाठी अनावश्यक अर्जाचा खेळ विभागीय कार्यालय स्तरावर कशासाठी होतो यात कुणाकुणाचे हात ओले होतात याची चौकशी प्रशासन करणार का ? असाही सवाल उपस्थित केला जात आहे.  

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

[yop_poll id="2"]
[yop_poll id="1" show_results="1"]

Most Popular

Recent Comments