Homeक्राईमरस्तालुटीच्या घटनेतील फिर्यादीच निघाला आरोपी; मित्रांसोबत रचला बनाव

रस्तालुटीच्या घटनेतील फिर्यादीच निघाला आरोपी; मित्रांसोबत रचला बनाव

नाशिक प्रतिनिधी

चांदवड पोलिसांनी दोनच दिवसांत रस्तालुटीतील गुन्ह्याची उकल केली असून फिर्यादीच आरोपी निघाल्याने त्याला अटक केली आहे. चांदवड मनमाड रस्त्यावरील शेळ्या विक्रीचे अडीच लाख रुपये लूट प्रकरणातील फिर्यादीच या षडयंत्राचा सूत्रधार निघाला आहे. पिकअपचालकाने मनमाडमधील पाच मित्रांना सहभागी करून घेत या लुटीचा बनाव केल्याचे निष्पन्न झाले आहे. फिर्यादी आमीर ऊर्फ शोएब जब्बार सय्यद (२३, आययुडीपी, भवानी चौक, मनमाड) सह अन्य दोघांना पोलिसांनी अटक केली असून, तिघे फरार आहेत. तिन्ही संशयितांना चांदवड न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक कैलास वाघ व पोलिस उपनिरीक्षक सुरेश चौधरी यांनी दिली. मनमाड येथील शेळ्या खरेदी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्याचा माल १६ डिसेंबरला कल्याणला पाठविण्यात आला होता. शेळ्या विक्रीचे अडीच लाख रुपये घेऊन पिकअपचालक आमीर हा १७ डिसेंबरच्या मध्यरात्री १२.४५ च्या सुमारास परतत होता. मनमाड रस्त्यावरील म्हसोबा मंदिर परिसरात दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी पिकअप अडवून चाकूचा धाक दाखवून अडीच लाखांची रोकड आणि मोबाइल पळवून नेल्याचा प्रकार घडला होता. तशी फिर्यादच चालक आमीरने चांदवड पोलिसांत नोंदवली होती. पोलिसांना फिर्यादीच्या हालचालींबाबत संशय आला. त्यामुळे आमीरची उलट तपासणी करीत पोलिसी खाक्या दाखवताच त्याने चोरीची कबुली दिली. व्यापारी कमी पैसे देत असल्याने मित्रांच्या सहाय्याने चोरी केल्याचे त्याने सांगितले. चांदवड पोलिसांनी फिर्यादी आमीर, त्याचा मित्र इंजमाम ऊर्फ भय्या सलीम सय्यद (२४) व उजेर आसिफ शेख (२२) यांना अटक केली. तर इतर तिघे संशयित फरार असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

[yop_poll id="2"]
[yop_poll id="1" show_results="1"]

Most Popular

Recent Comments