Homeताज्या बातम्याशेतकर्‍यांचे दुख विधानभवनापर्यंत नेणार, किसान काँग्रेसच्या शेतकरी संवाद,यात्रेला जिल्ह्यात प्रतिसाद

शेतकर्‍यांचे दुख विधानभवनापर्यंत नेणार, किसान काँग्रेसच्या शेतकरी संवाद,यात्रेला जिल्ह्यात प्रतिसाद

धुळे  प्रतिनिधी 

धुळे जिल्हयातील कापूस उत्पादक शेतकर्‍यांच्या कापसाला भाव नाही, राज्यात पूर्ण दुष्काळ जाहिर नाही, पूर्णपणे कोणालाही पिक विमा मिळाला नाही ,त्यामुळे संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांच्या वेदना आणि दुख विधाभवनापर्यंत नेण्यासाठी शेतकरी संवाद यात्रा काढण्यात आली असल्याचे प्रतिपादन शेतकरी व शेतमजूर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पराग पस्टे यांनी केले. धुळे जिल्हयात आ.कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी संवाद यात्रेचे उत्साहात स्वागत करण्यात आले असून संवाद यात्रेला जिल्हयात प्रतिसाद मिळाला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ.नाना पटोले यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अंतर्गत महाराष्ट्र प्रदेश किसान व खेत मजदूर काँग्रेसतर्फे नंदुरबार ते नागपूर शेतकरी संवाद यात्रा काढण्यात आली आहे. या शेतकरी संवाद यात्रेचे धुळे जिल्हयात उत्साहात स्वागत करण्यात आले. साक्री तालुक्यातील सिंदबंद, छडवेल कोर्डे ,टीटाणे, जैताणे, निजामपूर, बळसाणे, दुसाणे मार्गे धुळे तालुक्यात लामकानी, चिंचवार, मेहेरगाव, निमडाळे,गोंदूर अशी शेतकरी संवाद यात्रा काढण्यात आली. यावेळी ठिकठिकाणी शेतकरी संवाद यात्रेचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. धुळे ग्रामीण विधानसभा मतदार संघातील भोकर येथील शिवरत्न मंगल कार्यालयात शेतकरी संवाद यात्रेची जाहिर सभा घेण्यात आली. यावेळी सभेत प्रदेश किसान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पराग पष्टे,धुळे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष शामकांत सनेर, नाशिक जिल्हा काँग्रेस अध्यक्ष डॉ.तुषार शेवाळे, विश्‍वंभर बाबर यांनी मार्गदर्शन केले.सभेचे प्रास्ताविक डॉ.दरबारसिंग गिरासे यांनी केले तर सुत्रसंचालन डॉ.सदाशिव सुर्यवंशी यांनी केले.आभार जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष के.डी. पाटील यांनी मानले. शेतकरी संवाद यात्रेत सहभागी झालेल्या पदाधिकार्‍यांनी चिंचवार, मेहेरगाव, निमडाळे येथील शेतांमध्ये जाऊन शेतकर्‍यांशी संवाद साधला. यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी शेतकर्‍यांचे दुख जाणून घेण्यासाठी थेट शेतकर्‍यांच्या बांधावर आल्याचे पाहून शेतकरी गहीवरून गेले आणि त्यांचे अश्रू अनावर झाले.यावेळी किसान काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी शेतकर्‍यांना आधार देत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी हा लढा असल्याचे सांगितले. शेतकरी संवाद यात्रेत किसान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पराग पस्टे, प्रदेश उपाध्यक्ष उत्तम देसले, अ‍ॅड.राम कुर्‍हाडे,किशोर वानखेडे,संपत वक्ते, बळवंत गावीत,धुळे जिल्हा काँग्रेस अध्यक्ष शाम सनेर, डॉ.तुषार शेवाळे,धुळे जिल्हा किसान काँग्रेस अध्यक्ष शाम भामरे, धुळे तालुका काँग्रेस अध्यक्ष डॉ.दरबारसिंह गिरासे, माजी पं.स.सभापती भगवान गर्दे, बाजार समितीचे संचालक गुलाबराव कोतेकर, उपसभापती योगेश पाटील, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा गायत्री जयस्वाल, आदी सहभागी झाले होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

[yop_poll id="2"]
[yop_poll id="1" show_results="1"]

Most Popular

Recent Comments