Homeताज्या बातम्यानायगाव शिवारात आतापर्यंत सहा बिबटे जेरबंद

नायगाव शिवारात आतापर्यंत सहा बिबटे जेरबंद

सिन्नर प्रतिनिधी 

सिन्नर तालुक्यातील नायगाव शिवारात शिंदे वस्तीवर पुन्हा एक मादी बिबट्या जेरबंद करण्यात आला आहे. या परिसरात जेरबंद झालेला हा सहावा बिबट्या आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नायगाव शिवारात बिबट्यांनी उच्छाद मांडला असल्यामुळे नागरिक दहशततिच्या वातावरणाखाली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या मागणीनंतर वन विभागाने पिंजरा लावला होता. मंगळवारी मध्यरात्री या पिंजऱ्यात अंदाजे अडीच वर्षांची मादी बिबट्या जेरबंद झाला. गोपाळा शंकर शिंदे यांच्या शेळीसह बोकडावर हल्ला करून बिबट्याने फस्त केले होते. त्यानंतर शिंदे वस्ती जवळ भाऊसाहेब शंकर शिंदे यांच्या घराजवळ पिंजरा लावण्यात आला होता. दरम्यान, बिबट्या जेरबंद झाल्याची माहिती मिळाल्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी मनीषा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक रोहित लोणारे, निखिल जाधव, रवी जाधव, माजी सैनिक संजय गीते यांच्यासह वन कर्मचाऱ्यांनी बिबट्याला ताब्यात घेतले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

[yop_poll id="2"]
[yop_poll id="1" show_results="1"]

Most Popular

Recent Comments