Homeताज्या बातम्यामहाडीबीटी पोर्टलच्या तांत्रिक अडचणींचा शिष्यवृत्ती लाभार्थी विद्यार्थ्यांना मनस्ताप

महाडीबीटी पोर्टलच्या तांत्रिक अडचणींचा शिष्यवृत्ती लाभार्थी विद्यार्थ्यांना मनस्ताप

कळवण प्रतिनिधी

राज्य शासनाच्या् विविध शिष्यवृत्ती योजनांकरिता लाभार्थी विद्यार्थ्यांकडून अर्ज भरण्यास सुरुवात झाली पण महाडीबीटी पोर्टलवर अर्जच दाखल होत नसल्याने विद्यार्थी हवालदिल झाले आहेत. पोर्टलवर तासान तास अर्ज करण्यासाठी वेळ दिला तरी अर्ज दाखल करता येत नसल्याने गैरसोयीमुळे काही विद्यार्थी शिष्यवृत्ती योजनेपासून वंचित राहाण्याची भीती व्यक्त केली जाते आहे.परंतु अडथळ्यांचा डोंगरपार करत अर्ज दाखल करावे लागत असल्याने विद्यार्थ्यांची दमछाक होते आहे. संकेत स्थळावर कुठेही बंद असलेबाबत किवा दुरुस्ती चालू असलेले बाबत माहिती दिलेली अथवा सूचना दिसत नसल्याने विद्यार्थी मेटाकुटीला आले आहेत.

अडचणींचा करावा लागतोय सामना

मिळालेल्या माहितीनुसार गेल्याच सुमारे वीस ते पंचवीस दिवसांपासून पोर्टलवर विविध प्रकारच्याू तांत्रिक अडचणी उद्‌भवत आहेत संकेतस्थटळावर विद्यार्थ्यांची प्राथमिक माहितीवर आधारित प्रोफाइल अपडेट होताना तांत्रिक अडचणी येत आहेत.प्रोफाईलला आधार उपडेट करण्यासाठी ओटीपी टाकून टाकून विद्यार्थी वैतागले पण प्रोफाईल अपडेट होत नसल्याने नाहक त्रास सहन करावा लागत आहे.त्यात नवीन अर्ज करतांना आधार कार्ड नंबर टाकून त्याचा ओटीपी येत नाही आधार सर्वर नॉट रिचेबल म्हणते ओटीपी टाकून देखील लॉगीन तयार होत नाही तर काहींचे चुकून झाले तर प्रोफाईल भरली जात नाही.अशा एक ना अनेक अडचणीमुळे विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. पोर्टलचा पूर्णपणे फज्जा उडाल्याचे चित्र आहे.

शासनाचे व सबंधित विभागाचे दुर्लक्ष-
पोर्टलवर दिलेल्या मुखमंत्री सह्हायता कक्ष मदत क्रमांक पूर्ण माहिती देण्यात असमर्थ होत असल्याने विद्यार्थी व पालक त्रस्त होत आहेत.सहायता कक्ष पोर्टलवर जाऊन तक्रार टाकावी असे सांगते पण पोर्टलवर तक्रार टाकण्यास गेले तर ती देखील लिंक चालत नाही.

कुठे कुठे भरले जातात अर्ज व मुदत –
स्वतःविद्यार्थी,विद्यालय,कॉलेज,सायबर कॅफे,कॉम्पुटर सेंटर,ई-सेवा केंद्र अशा अनेक ठिकाणी प्रयत्न करून देखील अर्ज भरले जात नाही
चुकन एखाद पूर्ण होत आहे.सदर शिष्यवृत्ती अर्ज दाखल करण्याची मुदत ३१/०३/२०२४ पर्यंत आहे.

अनेक दिवसापासून वेबसाईट चालत नसल्याने विद्यार्थी वैतागले आहेत.अनेक वेळा तक्रार टाकून देखील पोर्टल पूर्णपणे चालत नसल्याने गैरसोय होत आहेत.लवकरात लवकर पोर्टल अडचणी दूर करून अर्ज दाखल होतील यासाठी सबंधित विभागाने प्रयत्न करावे –चेतन शिंदे,कॉम्पुटर व सायबर कॅफे चालक

संकेतस्थळ बंद असलेबाबत किवा दुरुस्ती चालू असलेले बाबत नोटीस देण्यात यावी पोर्टलवर, पोर्टलवर तक्रार करण्यासाठी सबंधित विभागाचा नंबर देण्यात यावा,आम्ही २० दिवस झाले घरी पण प्रयत्न करत आहोत आणि ई-सेवा केंद्र व कॅफेत देखील जात आहोत पण अर्ज दाखल होत नसल्याने त्रास सहन करावा लागत आहे आणि अभ्यासाचे देखील नुकसान होत आहे – आदित्य देवरे, विद्यार्थी

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

[yop_poll id="2"]
[yop_poll id="1" show_results="1"]

Most Popular

Recent Comments