Homeक्राईमतरुणाचा खून करणाऱ्या गुन्हेगारी टोळक्यावर मोक्का अंतर्गत कारवाई

तरुणाचा खून करणाऱ्या गुन्हेगारी टोळक्यावर मोक्का अंतर्गत कारवाई

धुळे प्रतिनिधी 

तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करणाऱ्या टोळक्याच्या विरोधात मोका अंतर्गत कारवाई करण्यास नासिक विभागाचे पोलीस महानिरीक्षक डॉ  बी जी शेखर यांनी परवानगी दिली आहे .त्यामुळे या आरोपींना आता मोक्काचे वाढीव कलम लावण्यात आले असल्याची माहिती आज पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली आहे. धुळे जिल्ह्यातील गुन्हेगारी मोडून काढणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले. धुळे येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी या कारवाई संदर्भात माहिती दिली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक दत्तात्रय शिंदे, यांची उपस्थिती होती. धुळे शहरात गांधी पुतळ्याजवळ महेश पवार उर्फ लाल डोळा, अक्षय साळवे, गणेश माळी, एक अल्पवयीन मुलगा तसेच जगदीश चौधरी, नासिक येथील शरद , गणेश पाटील, जिभ्या यांनी शुभम साळुंखे या तरुणावर धारदार शस्त्राने वार केले. यानंतर याला तेथून उचलून नेऊन डम्पिंग ग्राउंड परिसरात त्याच्यावर हल्ला चढवला. यात त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणात शुभम साळुंखे याला मारण्यासाठी विनोद रमेश थोरात तसेच हर्षल रघुनाथ चौधरी यांनी आरोपींना सुपारी देऊन चिथावणी दिल्याची बाब देखील स्पष्ट झाली. त्यामुळे या सर्व दहा जणांविरोधात भादवि कलम 302, 364, 143, 147, 149 ,323, 504, 506, 120 ब ,सह हत्यार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला. तपासा अंती या गुन्ह्यात भादवी कलम 109 ,201 आणि 75 हे वाढीव कलम लावण्यात आले. या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी सुरू केला. यात या आरोपींनी गेल्या दहा वर्षात संघटित गुन्हेगारी करून तीन वर्षापेक्षा जास्त शिक्षेस पात्र असलेली गुन्ह्याची बाब निदर्शनास आणली. याची न्यायालयाने देखील दखल घेतली. या सर्व आरोपींना विरोधात 26 गुन्हे दाखल असल्याची बाब देखील उघडकीस आली असून यातील दोन गुन्ह्यांमध्ये शिक्षा देखील झाल्याची बाब उघडकीस आली. प्रचलित कायद्यानुसार प्रतिबंधित केलेले बेकायदेशीर कृत्य आरोपींच्या टोळीने स्वतःचे व टोळीच्या सदस्यांच्या आर्थिक फायद्यासाठी केल्याची बाब उघड झाली. त्यामुळे समाजविघातक संघटना किंवा टोळी यांच्या गुन्हेगारी कृत्यास प्रतिबंध करण्यासाठी व त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष तरतुदी करण्याकरता महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन 1999 अन्वये कारवाई करण्याबाबत विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ बी जी शेखर पाटील यांनी आदेशित केले आहे. यासाठी तपास अधिकारी दत्तात्रय शिंदे यांनी पोलीस महानिरीक्षक यांच्या पूर्व परवानगीसाठी प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार त्यांनी मोक्का कायद्या अंतर्गत वाढीव कलम लावण्यास परवानगी दिल्याची माहिती देखील यावेळी देण्यात आली. त्यामुळे आता पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. दरम्यान धुळ्याची कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी विशेष लक्ष दिले जाणार आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

[yop_poll id="2"]
[yop_poll id="1" show_results="1"]

Most Popular

Recent Comments