Homeताज्या बातम्याढगाळ हवामान अन‌ पावसाचा अंदाजाने द्राक्षनगरीत चिंतेचे ढग

ढगाळ हवामान अन‌ पावसाचा अंदाजाने द्राक्षनगरीत चिंतेचे ढग

निफाड प्रतिनिधी

हवामानात बदल झाला असल्याने राज्यात सर्वत्र ढगाळ वातावरण तयार झाले आहे त्याचबरोबर येत्या चार दिवसात पाऊसाचे अंदाज व्यक्त केले असल्याने द्राक्ष बागायतदारांची झोप उडाली आहे चिंतेत वाढ झाली आहे सध्या नाशिक जिल्ह्यात द्राक्ष बागांच्या कामांची लगबग सुरु आहे घडथिनिंग ,डिपिंग ,‌फेलफुट या कामांची रेलचेल आहे मात्र शुक्रवार सकाळपासुन ढगाळ हवामान तयार झाल्याने द्राक्ष बागायतदार हवालदिल झाले आहेत या ढगाळ हवामानामुळे डावणी भुरी हे बुरशीजन्य रोग डोके वर काढु लागले आहेत तर फुलोरा अवस्थेत द्राक्षनगरीत पाऊस झाला तर घडकुज अन मणीगळ होण्याचा या मोठ्या संकटाचा धोका निर्माण झाला आहे त्यामुळे द्राक्षनगरीत सकाळपासुन रोगप्रतिकारक औषधांची फवारणी करुन संभाव्य धोक्यांची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न द्राक्ष बागायतदार करत आहेत

द्राक्षबागांवर बुरशीजन्य रोगांचा होणारा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी रोगप्रतिकारक औषधांचा पर्याय आहे मात्र तो खर्चात वाढ करणारा आहे शिवाय फुलोरा अवस्थेतील द्राक्षबागांवर पाऊस पडल्यास घडकुज व मणीगळ होण्याचे संकट कोणत्याही उपायाने दुर करता येत नाही त्याकरिता प्लास्टिक आच्छादन हाच एकमेव पर्याय आहे – अँड रवींद्र निमसे
अध्यक्ष महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ पुणे,विभाग नाशिक

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

[yop_poll id="2"]
[yop_poll id="1" show_results="1"]

Most Popular

Recent Comments