Homeक्राईमशिरपूर शहर पोलीस ठाण्यातील लाचखोर पोलीस नाईक एसीबीच्या जाळ्यात

शिरपूर शहर पोलीस ठाण्यातील लाचखोर पोलीस नाईक एसीबीच्या जाळ्यात

शिरपूर प्रतिनिधी 

शिरपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यावरून प्रतिबंधात्मक कारवाई तसेच अटक टाळण्यासाठी पंधराशे रुपयाची लाच स्वीकारणाऱ्या पोलीस नाईकास धुळ्याच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहे. तक्रारदार हे शिरपूर शहरातील रहिवासी असून त्यांच्या विरोधात शिरपूर शहर पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यामुळे त्यांनी पोलीस ठाण्यात संपर्क केला असता त्यांना पोलीस नाईक लक्ष्मीकांत टाकणे यांनी ही कारवाई टाळणे तसेच अटक न करण्यासाठी 1हजार 500 रूपयांची लाच मागितली. मात्र लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे सदर तक्रारदाराने धुळे येथे येऊन उपअधीक्षक अभिषेक पाटील यांची भेट घेऊन या घटनेची माहिती दिली. यावरून पाटील यांनी शिरपूर येथे या तक्रारीची पडताळणी केली. यानंतर उप अधीक्षक अभिषेक पाटील, पोलीस निरीक्षक रूपाली खांडवी तसेच राजन कदम, मुकेश अहिरे, सुधीर अहिरे, जगदीश बडगुजर ,मकरंद पाटील, आदी पथकाच्या मदतीने सापळा लावला. यावेळी पोलीस नाईक लक्ष्मीकांत टाकणे यांनी ठरल्याप्रमाणे तक्रारदार यांच्याकडून 1500 रुपये स्वीकारताच त्यांना तातडीने ताब्यात घेण्यात आले. या संदर्भात शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

[yop_poll id="2"]
[yop_poll id="1" show_results="1"]

Most Popular

Recent Comments