Homeराजकारणमाकपाचा आजपासून नाशिक पर्यंत पायी लाॅग मार्च

माकपाचा आजपासून नाशिक पर्यंत पायी लाॅग मार्च

विशेष प्रतिनिधी | बोरगाव

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने बुधवारी (दि.२१) बर्डीपाडा (ता. सुरगाणा) येथून नाशिक येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर विविध मागण्यासाठी माजी आमदार जे. पी. गावित यांच्या मार्गदर्शनाखाली पायी लाॅग मार्च काढण्यात येणार अाहे. यात १० हजार शेतकरी सहभागी होणार असल्याची माहिती सुरगाणा पंचायत समितीचे माजी सभापती इंद्रजित गावित यांनी दिली.
यामध्ये प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे कांद्याला उत्पादन खर्चावर आधारित किमान दोन हजार रुपये भाव निश्चित करून निर्यातबंदी तत्काळ उठवण्याचे धोरण जाहीर करावे, कसणाऱ्यांच्या कब्जात असलेली ४ हेक्टरपर्यंतची वन जमीन कसणाऱ्याच्या नावे करून ७-१२ कब्जेदारी सदर कसणाऱ्याचे नाव लावावे, शेतकऱ्यांच्या शेतीला लागणारी वीज २४ तास द्यावी, शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, प्रधानमंत्री आवास योजना व शबरी घरकुल योजनेचे अनुदान १ लाख ४० हजार रुपयांवरून ५ लाख रुपये करावे, महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांना व इतरांना लागू असलेली वृद्धापकाळ पेन्शन योजनेची रक्कम १५०० रुपयांवरून चार हजार रुपयांपर्यंत वाढवावी, रेशनकार्डवर दरमहा मिळणाऱ्या मोफत धान्यासह विकतचे धान्य पुन्हा सुरू करावे अशा ११ मागण्यांसाठी २६ फेब्रुवारीला पायी लाॅगमार्च करत नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहाेचणार आहे. या लाॅगमार्चचा सुरगाणा, सराड, कृष्णगाव, दिंडोरी, म्हसरूळ येथे साेयीनुसार मुक्काम हाेणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

[yop_poll id="2"]
[yop_poll id="1" show_results="1"]

Most Popular

Recent Comments