Homeताज्या बातम्याचांदोरी नजीक धावत्या शिवशाहीला भीषण आग सुदैवाने जीवित हानी टळली

चांदोरी नजीक धावत्या शिवशाहीला भीषण आग सुदैवाने जीवित हानी टळली

निफाड प्रतिनिधी 

निफाड तालुक्यातील चांदोरी जवळील शिंपी टाकळी फाटा येथे नाशिक ते छत्रपती संभाजी नगर राज्य मार्गावर रविवार दि. 10 रोजी दुपारी सव्वा दोन वाजेच्या सुमारास धावत्या शिवशाही बसला भीषण आग लागली. सुदैवाने या दुर्घटनेत बस मधील 25 प्रवासी सुखरूप असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
नाशिक ते छत्रपती संभाजी नगर राज्य मार्गावर शिंपी टाकळी फाटा येथे ही दुर्घटना घडली, शिवशाही बस क्रमांक एम एच ०९, एफ एल ०४७७ ही बस नाशिकहून छत्रपती संभाजी नगर कडे जात असताना आज दिनांक 10 डिसेंबर 2023 रोजी दुपारी सव्वा दोन वाजेच्या सुमारास धावत्या बस मध्ये इंजिनच्या बाजूने दूर निघत असल्याचे चालकाच्या लक्षात आले, वाहकाने तत्काळ सदरची बस थांबून सतर्कतेने बस मधील प्रवासी खाली उतरून दिले, त्यानंतर काही क्षणातच बसने मोठ्या स्वरूपात पेट घेतला व या आगीत ही संपूर्ण बस भक्षस्थानी पडली, सदरच्या घटनेमुळे नाशिक ते छत्रपती संभाजी नगर राज्य मार्गावर वाहतूक ठप्प झाली, मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती, चांदोरी येथील आपत्ती व्यवस्थापन पथकातील जवान आपत्ती व्यवस्थापन समिती अध्यक्ष सागर गडाख, सोमनाथ कोटमे,भाऊ कर्डिले किरण वाघ, सुरज पगारे,सचिन कांबळे, निलेश नाठे, गोकुळ टरले, घटनास्थळी उपस्थित होते
स्थानिक नागरिकांनी यावेळी आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. दरम्यान या घटनेत सर्व प्रवासी सुखरूप असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

[yop_poll id="2"]
[yop_poll id="1" show_results="1"]

Most Popular

Recent Comments