Homeताज्या बातम्याचांदवडला सोमवारी शरद पवारांच्या उपस्थितीत आंदोलन…

चांदवडला सोमवारी शरद पवारांच्या उपस्थितीत आंदोलन…

नाशिक प्रतिनिधी

केंद्र सरकारने कांद्याची निर्यात बंदी केल्याने नाशिक जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक झाले असून सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीतत चांदवड येथे सकाळी १० वाजता आंदोलन करण्यात येणार आहे. कांद्याच्या प्रश्नावर पहिल्यांदाच शरद पवार हे रस्त्यावर उतरणार असल्यामुळे या आंदोलनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शुक्रवारी चांदवड मुंबई आग्रा महामार्गावर एक तासा पेक्षा जास्त वेळ शेतक-यांनी रास्ता रोको केला. त्यानंतर पोलिसांनी या ठिकाणी आंदोलकांवर सौम्य लाठीचार्ज केला होता. त्यामुळे पवार यांनी चांदवडची निवड केली असून येथे आंदोलन करण्याचा निर्णय़ घेतला आहे. काल शेतक-यांनी जिल्हयात ठिकठिकाणी आंदोलन झाले. त्यानंतर नाशिक जिल्हा कांदा व्यापा-यांनी बेमुदत कांदा लिलाव बंद करण्याचा निर्णय़ घेतला. त्यामुळे कांद्याचा प्रश्न आता चिघळणार असल्याचे चित्र आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

[yop_poll id="2"]
[yop_poll id="1" show_results="1"]

Most Popular

Recent Comments