Homeक्राईमजिंदाल कंपनीचा बनावट स्टील पट्टी तयार करणारा कारखाना धुळे एलसीबी कडून उध्वस्त

जिंदाल कंपनीचा बनावट स्टील पट्टी तयार करणारा कारखाना धुळे एलसीबी कडून उध्वस्त

धुळे प्रतिनिधी

छताचे पीओपी तयार करण्यासाठी लागणारे जिंदाल कंपनीची बनावट स्टील पट्टी तयार करण्याचा कारखाना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या पथकाने उध्वस्त केला असून या प्रकरणात 24 लाख 32 हजाराचा मुद्देमाल जप्त केला असून एका जणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली आहे. धुळ्याच्या चाळीसगाव रोड परिसरातील शंभर फुटी रस्त्यालगत स्मार्ट स्टील या दुकानांमध्ये छताच्या पीओपी साठी लागणारे साहित्य विक्रीसाठी ठेवले जाते. या साहित्यपैकी स्टील दर्जा असणाऱ्या पत्र्याचा वापर करून जिंदाल कंपनीचा छापील बनावट शिक्का मारून स्टीलची पट्टी तयार केली जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली. त्यानुसार पोलीस अधीक्षक धिवरे यांच्यासह पथकातील निरीक्षक धीरज महाजन, उपनिरीक्षक बाळासाहेब सूर्यवंशी, सहाय्यक उपनिरीक्षक अमरजीत मोरे ,मच्छिंद्र पाटील, संदीप सरक ,शोएब बेग , राजू गीते यांनी या दुकानावर छापा मारला .यावेळी या दुकानात स्टीलची पट्टी तयार करण्याचे एक मशीन आढळून आले. या मशीनवर जिंदाल कंपनीचा शिक्का मारण्याची यंत्र आढळून आली. एका मशीनद्वारे पत्र्यावर पीओपी ला लागणाऱ्या पट्टीचा आकार देऊन त्यावर नीलकमल कंपनीच्या प्रिंटरने जिंदाल अशा नावाची छपाई केली जाऊन या पट्टीची कटिंग होत असल्याचे दिसून आले .त्यामुळे दुकानाचे मालक मुक्तार खान शहजाद खान यांना या छपाईच्या परवान्याबाबत विचारपूस केली असता त्याच्याकडे कोणताही परवाना नसल्याची बाब निदर्शनास आली. तसेच सध्या जिंदाल कंपनीच्या या साहित्याला बाजारात मागणी असल्याने प्रिंटरच्या माध्यमातून अशी छपाई होत असल्याचे प्राथमिक तपासातून पुढे आले .त्यामुळे मुक्तार खान याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनास्थळावरून मशीन सह 24 लाख 32 हजाराचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

[yop_poll id="2"]
[yop_poll id="1" show_results="1"]

Most Popular

Recent Comments