Homeताज्या बातम्यापाणीपट्टी दरवाढीला स्थगितीच!

पाणीपट्टी दरवाढीला स्थगितीच!

नाशिक प्रतिनिधी 

महापालिकेने स्थायी समितीच्या सभेत घेतलेला पाणीपट्टी दरवाढीचा व मलजल उपभोक्ता शुल्क आकारणीचा निर्णय स्थगित करण्यात आला आहे. यामुळे पूर्वीप्रमाणेच नाशिककरांना पाणीपट्टी आकारली जाईल, असे मनपा आयुक्त अशोक करंजकर यांनी बुधवारी स्पष्ट केले. महापालिका पाणी पुरवठा विभागाने घरगुती, बिगर घरगुती व व्यावसायिक पाणी पट्टीदरात वाढीसाठी स्थायी समितीवर ठेवलेल्या प्रस्तावाला शुक्रवारी सभेत करंजकर यांनी मंजुरी दिली होती. यामुळे घरगुती, बिगर घरगुती व व्यावसायिक या तिन्ही प्रकारात १४० टक्के वाढ झाली होती. तर हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी महासभेवर ठेवला जाणार होता. मात्र त्यापुर्वीच या निर्णयला स्थगिती देण्याचा निर्णय झाल्याने नाशिककरांसाठी दिलासादायक निर्णय ठरला. दरवाढीचा प्रस्ताव बेकायदेशीर असल्याची टीका राजकीय पक्षांकडून केली जात होती.

वाढीव पाणीपट्टी कायमस्वरूपी रद्द करण्यात यावी – दशरथ पाटील
नाशिक महापालिकेने तीन पट आकारलेली वाढीव पाणीपट्टी व मलजल शुुल्क फेटाळण्यात यावा अशी मागणी माजी महापाैर दशरथ पाटील यांनी मनपा आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे. सदर दरवाढ पालकमंत्री दादा भुसे यांनी दिलेल्या निर्देशानुसार हा प्रस्ताव तहकूब अथवा स्थगित करण्याचे प्रशासनाने जाहीर केले, परंतु सदरचा प्रस्ताव कायमस्वरूपी वगळण्यात यावा किंवा फेटाळण्यात यावा. तसेच सन २०१८ ची घरपट्टीची व पाणीपट्टी केलेली अवाजवी दरवाढ ही रद्द करण्याचा निर्णय झालेला असूनही अद्याप तीदेखील रद्द झालेली नसतांना पुन्हा ही नाशिककरांवर लादलेली वाढीव पाणीपटी व मलजल शुल्क परंतु सदरचा प्रस्ताव कायमस्वरूपी फेटाळण्यात यावा.

मनपाने ठेवलेला प्रस्ताव (प्रति हजार लिटर पाण्यासाठी दर रूपयात)
प्रकार प्रचलित दर (२०२३-२४) नवीन दर (२०२४-२५) २०२५-२६ २०२६-२७
घरगुती ५ १२ १३ १४
बिगर घरगुती २२ ३० ३२ ३५

व्यावसायिक २७ ३५ ३७ ४०
मलजल दर प्रति हजार लिटर
प्रचलित दर (२०२३-२४) नवीन दर (२०२४-२५) २०२५-२६ २०२६-२७
३ रूपये ३.५० रपये ४ रूपये ४.५० रूपये

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

[yop_poll id="2"]
[yop_poll id="1" show_results="1"]

Most Popular

Recent Comments