Homeताज्या बातम्यालोकशाही बळकट करण्यासाठी मतदार नोंदणी गरजेची- आप्पासाहेब शिंदे, प्रांत

लोकशाही बळकट करण्यासाठी मतदार नोंदणी गरजेची- आप्पासाहेब शिंदे, प्रांत

सागर मोर / वणी

दिंडोरी जनता इंग्लिश स्कुल व उच्च माध्यमिक विद्यालय, येथे मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी दिंडोरी यांच्या संयुक्त विद्यमाने आज विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम अंतर्गत नव मतदार नोंदणी अभियान निमित्ताने जनजागृती रॅली काढण्यात आली त्याप्रसंगी शिंदे बोलत होते. 1 जानेवारी 2024 रोजी 18 वर्ष पूर्ण होत असलेल्या युवक युवतींना मतदार नोंदणी करण्याचे आव्हाहन यावेळी शिंदे यांनी केले.दिंडोरी जनता मैदान पासून ते पालखेड चौफुली पर्यंत बँड पथक व घोषणा देत रॅली संपन्न झाली.रॅलीत जनता इंग्लिश स्कूल उच्च माध्यमिक विद्यालय दिंडोरी, गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल,अध्यापक महाविद्यालय दिंडोरी, व्ही एन नाईक महाविद्यालयातील विद्यार्थी व शिक्षक ,मुख्याध्यापक मोठ्या सहभागी झाले होते. रॅलीची सुरवात प्रांत अधिकारी आप्पासाहेब शिंदे प्राचार्य रमेश वडजे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य रमेश वडजे यांनी केले. लोकशाहीचा पाया बळकट करण्यासाठी अठरा वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक व्यक्तीने आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करणे आवश्यक आहे, त्यासाठी युवकांमध्ये जनजागृती केली जात आहे. शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती चव्हाण, नायब तहसीलदार मोती राय, दिंडोरीचे मंडल अधिकारी भारती रकीबे, प्राचार्य रमेश वडजे, प्राचार्य डॉ.संजय काळोगे केंद्रप्रमुख ठाकरे, गायकवाड तसेच पंचायत समिती व महसूल विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

[yop_poll id="2"]
[yop_poll id="1" show_results="1"]

Most Popular

Recent Comments