Homeताज्या बातम्याआदिवासी बांधवांचा आक्रोश मोर्चातून तीव्र आंदोलनाचा इशारा

आदिवासी बांधवांचा आक्रोश मोर्चातून तीव्र आंदोलनाचा इशारा

नाशिक प्रतिनिधी 

 जिल्हाधिकारी कार्यालयावर आदिवासीं अधिकार राष्ट्रीय मंच च्या वतीने आक्रोश मोर्चा काढण्यात आला. माजी आमदार जे पी गावीत, सिटू चे नेते डी एल कराड यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. दुपारी बारा वाजता गोल्फ क्लब मैदान पासून पंचवीस ते तीस हजार शेतकरी, शेतमजूर, कामगार, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आदिवासीं संघटना यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर घोषणांच्या अक्रोषात कूच केले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्व आंदोलक एकत्र येऊन सभेला सुरुवात झाली यावेळी राम चौरे, बागुल, इंद्रजीत गावीत, ठोंबरे, सावळीराम पवार, महेश टोपले सुनील मालुसरे यांनी मार्गदर्शन केले मोर्चाचे नेते जे पी गावीत यांनी देशातील भाजप च्या मोदी आणि राज्याचे शिंदे सरकार यांचा चांगलाच समाचार घेतला. भाजप सरकारने जाती जातीत, धर्मा धर्मात संघर्ष लावला आहे, देश विकायला काढले आहे, सत्तेसाठी काहीपण करायला तयार आहे, खोटी आश्वासने देणे आणि गोर गरीब जनतेची दिशाभूल करने हे कार्य चालू आहे. आदिवासी समाजाचे आरक्षण धोक्यात आणण्याची तयारी सुरू केली आहे, हे आरक्षण टिकविण्यासाठी एकत्र येऊन लढा देणे गरजेचे आहे. वनजमिन कायदा होऊन येथील सरकार अजूनही ताब्यातील फॉरेस्ट प्लॉट स्वतःच्या नावे करत नाही, स्वतंत्र सातबारा देत नाही. अनेक योजना जाहीर करतात मात्र आपल्या पदरात पडत नाही. लाँग मार्च मधील लेखी आश्वासन देऊन विश्र्वास घात केलेल्या सरकारला येणाऱ्या काळात धढा शिकविणार असल्याचे सांगितले.डी .एल यांनी म्हंटले की देशातील मोदी सरकारने आशा वर्कर्स अंगणवाडी सेविका मदतनीस यांना कायम करण्यासाठीं हे सरकार तयार नाही. तरुणांकडे, युवकांकडे दुर्लक्ष करुन लाखो युवक बेकार केले आहेत, शेतकरी देशोधडीला पडला आहे, कामगार संकटांत आहे पण येथील सरकार ना कायम करीत,ना पेंशन देत, अशी हालत करुण ठेवली आहे. येणाऱ्या काळात आपल्या सर्वांचे प्रश्न सोडवायचे असतील तर शेतकरी आणि सबंध कामगार, मेहेनत करणारे, श्रम करणारे असे सर्व कष्टाळू एकत्र आला पाहिजे. जे पी गावीत डी एल कराड यांच्या नेतृत्वाखाली आजच्या शिष्टमंडळाने मोर्च्यातील मागण्यांचे लेखी निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

[yop_poll id="2"]
[yop_poll id="1" show_results="1"]

Most Popular

Recent Comments