सुरगाणा प्रतिनिधी
महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित नुतन विद्यामंदिर सुरगाणा येथे आज मंगळवार दिनांक 28 नोव्हेंबर 2023 रोजी थोर समाज सुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम विद्यालयाचे प्राचार्य पी.के.चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली व विद्यालयाचे पर्यवेक्षक एस.एन.पवार यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला. सर्वप्रथम महान समाज सुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.या प्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
इयत्ता नववी व दहावीच्या काही विद्यार्थ्यांनी महात्मा फुले यांच्या जीवन कार्यावर आपले विचार व्यक्त केले शिक्षकांच्या वतीने पी.बी.खैरनार, पी .ए.चव्हाण यांनी फुलेंच्या सामाजिक व शैक्षणिक कार्यावर आपले मनोगत व्यक्त केले.