१७ संशयितांवर गुन्हे दाखल
नंदुरबार प्रतिनिधी
नंदुरबार पोलिसांनी मुलींची छेड काढणाऱ्या टवाळखोरांना दणका दिला आहे. दरम्यान मोटरसायकलचे सायलेन्सर मोठ्या आवाजात वाजवणे, सार्वजनिक ठिकाणी मोठ्या आवाजात शिवीगाळ करणे तसेच छेड काढणे असे प्रकार करणाऱ्या विरोधात डायल 112 वर संपर्क करून माहिती द्यावी पोलिसांकडून त्वरित कारवाई केली जाईल असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक पी आर पाटील यांनी केले आहे. गर्दीच्या ठिकाणी मुलींची किंवा महिलांची छेड काढण्याचे तसेच रात्रीच्यावेळी फिरण्यासाठी जाणाऱ्यांच्या मागून येत दुचाकीच्या सायलेन्सरचा जोरात आवाज करणे, शिवीगाळ करणे इत्यादी प्रकार काही टवाळखोर युवकांकडून होत असलेबाबत नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री.पी. आर. पाटील यांना तक्रारी प्राप्त होत होत्या. त्यामुळे अशा घटना टाळण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री.पी. आर. पाटील यांनी टवाळखोर करणाऱ्या युवकांविरुध्द पोलीस ठाणे स्तरावर महिला पोलीस अधिकारी व महिला अमंलदार यांचे एक पथक तयार करुन टवाळखोर करणाऱ्या युवकांविरुद् कारवाई करणेबाबतचे आदेश सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना दिले होते. त्याअनुषंगाने नंदुरबार जिल्ह्यातनंदुरबार शहर पोलीस ठाणे हद्दीतील नेहरु चौक, डी.आर. हायस्कूल परिसरात-08, उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील उड्डानपुल, सिंधी कॉलनी परिसरात- 05, नंदुरबार तालुका पोलीस ठाणे-02, विसरवाडी पोलीस ठाणे-02 असे एकुण 17 युवकांवर गर्दीच्या ठिकाणी व बाजार पेठांमध्ये टवाळकी करुन मुलींची छेडछाड करणाऱ्या युवकांना तसेच नागरिकांना त्रास देणाऱ्या टवाळखोर युवकांना संबंधीत पोलीस ठाण्याला आणून सक्त ताकीद देऊन पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. तसेच सदर युवकांनी यापुढे अशा प्रकारचे कृत्य केले तर त्यांच्या पालकांना संबंधीत पोलीस ठाण्यात बोलावून त्यांना त्यांच्या पाल्याच्या कृत्याबद्दल समज देवून त्यांच्या ताब्यात देण्यात येईल. तसेच पुन्हा त्या युवकांनी तिसऱ्या वेळेस देखील अशा प्रकारचे कृत्य केले तर त्याचेविरुद् कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. टवाळखोर युवकांवर कारवाई करण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाणे स्तरावर दामिनी पथकाची नेमणूक करण्यात आली असून अशा टवाळखोर युवकांविरुध्द् कारवाई करणेबाबतचे आदेश सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना दिलेले आहेत. सदरची मोहिम यापुढेअजून प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व पालकांनी आपल्या पाल्यांना सार्वजनिक ठिकाणी गैरकृत्ये करण्यापासून परावृत्त करावे तसेच गर्दीच्या ठिकाणी मुलींची किंवा महिलांची छेड काढणारे व रात्रीच्यावेळी फिरण्यासाठी जाणाऱ्यांच्या मागून येत दुचाकीच्या सायलेन्सरचा जोरात आवाज करणारे, शिवीगाळ करणाऱ्याची माहिती तात्काळ डायल-112 वर द्यावी असे आवाहन नंदुरबार जिल्हा पोलीस दल व नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक, नंदुरबार श्री. पी. आर. पाटील यांनी सर्व पालकांना केले आहे.