HomeUncategorizedपत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत जीवे ठार मारून पतीने स्वतः गळफास घेऊन केली...

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत जीवे ठार मारून पतीने स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या.

कुकूडणे येथील सीमावर्ती भागातील घटना.

सुरगाणा प्रतिनिधी 
पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत जीवे ठार मारून पतीने स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना कुकूडणे येथील देशमुख नगर येथे घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उंबरठाण पोलीस दुरक्षेत्र हद्दीतील कुकूडणे पैकी देशमुख नगर सीमावर्ती मयत पत्नी भागात वैशाली अर्जुन पवार वय २५ रा. देशमुख नगर व मयत पती अर्जुन शामल पवार वय २५ रा. बिशोनिया ता. व्यारा जि. तापी गुजरात हल्ली मुकाम देशमुख नगर कुकूडणे येथे हे पती पत्नी सीमावर्ती भागातील वन पट्यातील शेतात रहात होते.दोघांमध्ये नेहमीच एकमेकांच्या चारित्र्यावर संशय व्यक्त करीत भांडणे होत असत. १७ एप्रिल रोजी सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास पती अर्जुन पवार याने पत्नी वैशाली हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा गळा दाबून रहात्या घरात जीवे ठार मारले. आपल्या हातून गैर कृत्य घडले हे मयत आरोपी पती अर्जुन याच्या लक्षात येताच जंगलात वनपट्यातील एका सादड्याच्या झाडाला ओढणी व दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.याबाबत घटने बाबत पोलीस पाटील मनोहर चौधरी यांनी खबर दिली असून सोमनाथ कोदे यांनी तक्रार दाखल केली आहे. मयत आरोपी पती अर्जुन पवार यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत पती, पत्नी यांच्या पश्चात एकुलता एक सहा वर्षाचा मुलगा आहे. दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय सुरगाणा येथे आणण्यात आले होते. शवविच्छेदना नंतर गुजरात राज्यातील बिशोनिया या गावी एकाच सरणावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुजीत पाटील पाटील हे करीत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

[yop_poll id="2"]
[yop_poll id="1" show_results="1"]

Most Popular

Recent Comments