HomeUncategorizedसुरगाणा तालुक्यात पशूधन तस्करांचे राज्य

सुरगाणा तालुक्यात पशूधन तस्करांचे राज्य

सुरगाणा प्रतिनिधी 

सुरगाणा तालुक्यात अवैध दारू, जनावरे तस्करांच्या गुन्हां बरोबरच घरफोडीचे मोबाइल चोरीच्या प्रकार वाढत चालले असून पोलिसांचा धाक कमी झालाय की, काय? असा सवाल सर्वसामान्यांकडून व्यक्त केला जात आहे. सुरगाणा तालुक्यात गेल्या काही दिवसांत गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले असून चोऱ्या, अवैध दारू जनावरांची तस्करी असे अवैध धंदे तर फोफावलेच आहेत. असून या घटना चिंताजनक असल्याचे दिसुन येते. सुरगाणा तालुक्यात प्रामुख्याने बोऱ्या व सुरगाणा पोलीस स्टेशन अशी दोन पोलीस ठाणी असून नागरीकरण वाढत चालले असल्याने पोलिसांचीही काम करताना तितकीच दमछाक होत आहे. मध्यंतरीच्या काळात सुरगाणा तालुक्यात बहुतांश पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या; परंतु त्यानंतर मात्र काही पोलीस ठाण्यांनी परत नेमणुकाच असून बऱ्याच पोलीस ठाण्यांमध्ये मनुष्यबळ कमी असल्याचे दिसते. तालुक्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले सुरगाणा पोलीस स्टेशनला दबंग पोलीस निरीक्षक नेमावा, अशी मागणीही सर्वसामान्यांकडून केली जात आहे. तालुक्यात चोऱ्या, घरफोड्या, यावर अंकुश ठेवण्यात पोलीस आता अपयशी ठरताना दिसत आहेत. कारण साधारण गुंडा भाई बनलेले भूत आता पोलिसांच्या मानगुटीवर बसले असून त्याला आवर घालणे त्यांच्याही आवाक्याबाहेर गेल्याचे दिसते. यामुळे सुरगाण्यातील गुंडगिरी कमी होण्याऐवजी वाढतच आहे. खाकीचा धाक या तस्करांमध्ये कमी झाला असे म्हणण्याऐवजी शिल्लकच राहिलेला नाही, असेच म्हणावे लागेल. आता यावर अंकुश ठेवायचा असेल तर पोलिसांनी गुंडगिरी करणारा कुणीही असला तरी कुठलाही मुलाहिजा न बाळगता त्याच्यावर कारवाई करुन त्यांच्या मुसक्या आवळल्या पाहिजे. कुणावरही कारवाई करण्यासाठी अथवा ती थांबविण्यासाठी राजकीय पुढा-यांचा दबाव न जुमानता काम केले पाहिजे. शहरातील गुंडगिरीला खतपाणी घालणारे दारू, विक्रीचा व जनावरं व्यवसायाचा समूळ उच्चाटन केले पाहिजे. असे व्यवसाय कर चोणाऱ्यांवर मग ते कोणी असो त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. शहरात सुसाट वेगाने घेऊन जाणाऱ्या त्या भाईवरही न घाबरता कारवाई करून वेळीच त्याच्या वेगावर आवर घातला तरच पोलिसांची गेलेली प्रतिष्ठा पुन्हा मिळेल आणि खाकीची जरब गुंडांवर बसेल अन्यथा सुरगाण्यात जनावरे तस्करांचे राज्य आहे असेच म्हणावे लागले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

[yop_poll id="2"]
[yop_poll id="1" show_results="1"]

Most Popular

Recent Comments