HomeUncategorizedजिल्ह्यातील एमआयडीसी परिसरात शांतता प्रस्थापित करणार-देशमाने आयमा व निमाचे चे शिष्टमंडळ भेटले

जिल्ह्यातील एमआयडीसी परिसरात शांतता प्रस्थापित करणार-देशमाने आयमा व निमाचे चे शिष्टमंडळ भेटले

सिडको प्रतिनिधी

जिल्ह्यातील उद्योजकांच्या सुरक्षितेचे सर्व ते उपाय केले जातील आणि औद्योगिक वसाहत परिसरात गस्त वाढवली जाईल,असे आश्वासन नाशिक ग्रामीणचे नूतन पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी दिले.
अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा) आणि नाशिक इंडस्ट्रीज मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा)च्या पदाधिकाऱ्यांनी संयुक्तरित्या ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांची भेट घेऊन त्यांचे स्वागत व अभिनंदन केले त्यानंतर त्यास उत्तर देतांना देशमाने बोलत होते.
प्रारंभी निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे आणि आयमाचे अध्यक्ष ललित बूब यांनी उद्योजकांच्या विविध विषयांवर देशमाने यांच्याशी चर्चा करून त्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले.
उद्योजक हा देशाच्या विकासाचा कणा आहे.त्यामुळे जिल्ह्यातील औद्योगिक वसाहत परिसरात कायम शांतता नांदावी यासाठी आपण कसोशीने प्रयत्न करू. त्यासाठी उद्योजकांनी आवश्यक ते सर्व सहकार्य करावे, असेही देशमाने पुढे म्हणाले. पोलिस आणि उद्योजक यांची समन्वय समिती नेमावी. समितीच्या सातत्याने बैठका घेऊन उद्योजकांच्या विविध समस्यांचे निराकरण तातडीने व्हावे,असे शिष्टमंडळाने बैठकीच्यावेळी निदर्शनास आणले असता देशमाने यांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला.
शिष्टमंडळात निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे आणि आयमाचे अध्यक्ष ललित बूब .निमाचे सचिव राजेंद्र अहिरे,आयमाचे उपाध्यक्ष उमेश कोठावदे,सरचिटणीस प्रमोद वाघ,सचिव हर्षद बेळे, योगिता आहेर,निमाचे कार्यकारिणी सदस्य रवी शामदसानी,मनिष रावळ आदींचाही समावेश होता.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

[yop_poll id="2"]
[yop_poll id="1" show_results="1"]

Most Popular

Recent Comments