Homeताज्या बातम्यात्या लोकप्रतिनिधीचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल!

त्या लोकप्रतिनिधीचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल!

मायकल खरात  

एका संस्कारी गावातील सर्वसामान्य व्यक्ती ज्याच्या विचारात एकेकाळी जनतेसाठी काही करण्याची खरच उर्मी होती! त्यामुळे त्याच्या ‘भुजांमध्ये बळ’ देऊन मुळात एखाद्या बलाढ्य “आर्मस्ट्राँग” ला निवडणुकीत पराभूत करत जनतेने आपलं प्रतिनिधित्व करण्यासाठी दोन वेळेला संधी दिली या संधीचं सोनं( नावाचा अर्थ ) खरं तर करायला पाहिजे होतं. जनतेची दिशाभूल करत प्रशासकीय मान्यता नसलेल्या अनेक कामांचे भूमिपूजन पूजन करत, आपण खूप काही केलं, करतोय सतत असं दाखवण्याचं ढोंग सातत्याने होत असूनही त्याकडे खरतर सर्वसामान्य जनता दुर्लक्ष करत होती. भारतातील लोकप्रतिनिधी बाहेरील पूर्ण विकसित देशात जाऊन तेथील निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींच्या कामाची पद्धत अभ्यासण्यासाठी जातात आणि तीच पद्धत आपल्या देशात येऊन अवलंबण्याचा प्रयत्न करतात असा आतापर्यंतचा जनतेला आलेला अनुभव आहेच मात्र काळ बदलला आणि प्रतिनिधित्व करणारा संस्कारी गावातला सर्वसामान्य नेताही बदलला विकास काम करत आपलं कार्यक्षेत्र पण प्रतिनिधित्व करतो ते ठिकाण समृद्ध आणि प्रगतीपथावर नेण्याऐवजी हुक्का पित तोंडावर धूर फेकणाऱ्या मेणकाच्या मोह पाशात अडकलेला बघून खरंच संपूर्ण जनतेला वाईट वाटले, की आर्मस्ट्राँग असलेल्या बलाढ्य नेत्याचा पराभव करत संस्कारी वाटत असलेल्या सर्वसामान्याला संधी दिली तो इतका रंगीन मीजाजी असेल अशी कल्पनाही नव्हती आणि दुसरीकडे काहीही असो परंतु पराभूत झालेल्या रंगीत मफलर (इतकीच आवड) वापरणाऱ्या बलाढ्य आर्मस्ट्रॉंग बाबत निदान अशा पद्धतीचे कधीही आरोप झाले नाही. असो कुणी काय करावं हा प्रत्येकाचा वैयक्तिक विषय असतोच मात्र सार्वजनिक जीवनात जनतेचं प्रतिनिधित्व करणाऱ्यांना काही बंधन असतात ती नक्कीच पाळली पाहिजे. एकदा का तुम्ही लोकांच्या मनातून उतरलात मग तुम्ही “साखर वाटा, नाहीतर साखरेचा कारखानाच द्या” तुमच्या आंबट-शौकीनते मुळे जनतेच्या मनात निर्माण झालेला कडवटपणा काही केल्या जाणार नाही.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

[yop_poll id="2"]
[yop_poll id="1" show_results="1"]

Most Popular

Recent Comments