Homeताज्या बातम्यासप्तशृंग गडावरील ग्रामसेवक संजय देवरे यांचा मनमानी कारभार 

सप्तशृंग गडावरील ग्रामसेवक संजय देवरे यांचा मनमानी कारभार 

अस्वच्छेतेने गाठला कळस भाविकांची नाराजी

सप्तशृंगगड / तुषार बर्डे

साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्ध्ये स्वयंभू शक्तीपीठ असलेल्या श्री सप्तश्रृंगी देवी गडावर स्वच्छतेच्या बाबतीत ग्रामपंचायत प्रशासनाचे मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे, ग्रामसेवकांचया मनमानी कारभार मुळे गडावर लक्ष देत नसल्याने सर्वत्र उघड्या गटारी,तुंबलेल पाणी,वाढलेला प्लॅस्टिक कचरा ठिकठिकाणी दिसत आहे.वर्षभर देवस्थान कडे येणारे उत्पन्न एकीकडे त्यानंतर ग्रामपंचायतच्या उत्पन्नात वाढ व्हावी व गावात स्वच्छता, विकासकामे राबविली जावीत या उद्देशाने जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गडावर वाहन प्रवेश कर घेतला जातो,मात्र या उत्पन्नाचा यथायोग्य विनियोग होत नसल्याचे गडावर बोलले जात आहे.तसेच येथेच त्यांचे बस्तान बसवले आहे व गावात किंवा ग्रामपंचायत च्या कामात लक्ष देत नाही व सदस्य उपसरपंच विश्वासात घेतले जात नाही गेल्या दोन वर्षांपासून मनमानी पद्धतीने कारभार करीत आहे विकासकामे व रोजची ग्रामपंचायत मार्फत होणाऱ्या स्वच्छता बाबत ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामसेवक संजय देवरे यांच्याकडे अंगुलीनिर्देश केला असून,त्यांच्या कामकाज बाबतीत गडावर नाराजीचा सूर काढला जात आहे. ग्रामपंचायत उपसरपंच बेबीबाई जाधव,दत्तू बर्डे,राजेश गवळी,मनिषा गवळी आदींनी वेळोवेळी ग्रामसेवक पाटील बाबत कळवण चे गटविकास अधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदने दिली आहेत. मात्र अद्यापही कुठलीही कारवाई झालेली नाही. गडावर प्रवेश करताच अस्वच्छता, डुकरांचा वावर,ठिकठिकाणी उघडे चेंबर्स,व त्यामुळे पर्यटक व भाविकांची होणारी हेळसांड नित्याची बाब झाली आहे. प्लॅस्टिक बंदीबाबत सर्व नियम,निकषांना केराची टोपली दाखवण्यात आली आहे. अधिकृत व अनधिकृत असे किती टोल वसुली गडावर भाविकांच्या वाहनांकडून होते याबाबतीत स्थानिक पातळीवर लोकं उघड उघड बोलू लागले आहेत.सोमवारी एक महिला या उघड्या चेंबर्समध्ये पाय अडकून पडल्या. त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असले तरी गावात असे उघडे चेंबर्स भरपूर असून,ग्रामपंचायत प्रशासन याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करते की काय ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

गडावर गर्दी व अस्वच्छता

ऐन नाताळ च्या सुट्ट्या व वर्षाखेरीस येणाऱ्या भाविकांची गडावर मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता असून,येणाऱ्या भाविकांना,पर्यटकांना अस्वच्छताच जास्त आकर्षित करू लागली आहे.

रोपवे चालू व बंद

सप्तश्रृंगी गडावर सदैव भाविकांचे आकर्षण ठरणाऱ्या फर्निक्युलर रोप वे सद्यस्थितीत तांत्रिक अडचणींमुळे कधी चालू तर कधी बंद आढळत असतो.ऐन सुट्टीत रोपवे बंद मुळे लहान मुलं, जेष्ठ नागरिक यांना पायी पायरीने दर्शनासाठी जाणे अवघड ठरते.रोप वे बाबत यंत्रणेने गांभीर्याने घ्यायला हवे,पहाटेच्या काकड आरतीसाठी ऐन थंडीत येणाऱ्या भाविकांना या चालू व बंद रोपवेच्या भानगडीत पडावे लागते व रोप वे बंद झाल्यास नाहक मंदिरात प्रवेशासाठी धावपळ होतांना दिसून येते. वेळेचं महत्व बघता अनेकांना वेळेत पोहोचता न आल्याने हिरमोड झाल्याची उदाहरणे आहेत.

सप्तशृंग गड हे तीर्थक्षेत्र असल्याने याठिकाणी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते याठिकाणी सुविधा पुरविणे गरजेचे आहे पण येथील ग्रामसेवक देवरे हे आम्हाला विश्वासात घेत नसल्याने व मनमानी कारभार करीत असल्याने विकास कामे ठप्प होत चालले आहे – बेबीताई जाधव, सदस्या ग्रामपंचायत 

गावात ठिकठिकाणी अस्वच्छेतेने कळस गाठला असुन अस्वच्छेतेने गावाची बदनामी होत असुन यासाठी लाखो रुपये खर्चून ही याठिकाणी उपाययोजना होणे गरजेचे आहे पण याठिकाणी ग्रामसेवक देवरे हे भाविकांना व ग्रामस्थ सुविधा पुरविण्यात अपयश आले असुन सदर ग्रामसेवक ची बदली करण्यात यावी याबाबत पालकमंत्री ची भेट घेणार आहे – मनीषा मधुकर गवळी, उपसरपंच सप्तशृंगी गड

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

[yop_poll id="2"]
[yop_poll id="1" show_results="1"]

Most Popular

Recent Comments