Homeताज्या बातम्याबाऱ्हे ग्रामिण रुग्णालयाचा कारभार वाऱ्यावर

बाऱ्हे ग्रामिण रुग्णालयाचा कारभार वाऱ्यावर

बाऱ्हे : दिपक देशमुख

सुरगाणा तालुक्यातील बाऱ्हे विभाग हा प्रमुख बाजारपेठ असलेला भाग आहे या भागात हजारो नागरिक राहतात. नागरिकांच्या सोईसाठी बाऱ्हे येथे सुसज्ज असे ग्रामिण रुग्णालय उभारण्यात आले आहे. या ठिकाणी बऱ्याच सुविधा उपलब्ध आहेत, परंतु 108 रुग्णवाहिकाची मागणी बऱ्याच दिवसापासून प्रलंबित आहे या मागणीकडे लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या दुर्लक्ष पणामुळे अदयाप रुग्णवाहीका मिळालेली नाही .तसेच या रुग्णालयात अनेक नागरिक पंधरा-विस मैल पायपिट करत अति दुर्गम भागातून, दऱ्या-खोऱ्यातून रुग्ण उपचार घेण्यासाठी येत असतात. या नागरिकांना रुग्णालयात आल्यावर अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या बाऱ्हे रुग्णालयात कर्मचारी उपस्थित राहत नसल्यामूळ या रुग्णांना खूप त्रास सहन करावा लागत आहे.काही कर्मचाऱ्यांची रुग्णासोबत नेहमी अरेरावी असते या कर्मचाऱ्यांमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.उपचार बाजूलाच आणि या कर्मचार्यांच्या अरेरावीलाच रुग्णांना तोंड दयावे लागत आहे. रुग्णांना आरोग्य सुविधा पुरवताना कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष राहते. बाऱ्हे येथील रुग्णालयात अंदाजीत 25ते 30 कर्मचारी आहेत परंतु काही कर्मचारी फक्त हजेरी लावण्यापुरत येतात. काही कर्मचारी हजेरीपत्रकानुसार कर्तव्य न करता फक्त 3ते 4 तास कर्तव्य करून नाशिक ची वाट धरतात. या कामचुकार कर्मचाऱ्यावर लक्ष कुणीच ठेवत नाही.बाऱ्हे येथिल लोकप्रतिनिधी सुद्धा झोपेचे सोंग घेऊन शांत बसलेले असतात. या ठिकाणी बाऱ्हे ग्रामिण रुग्णालयात उपचार घेण्यासाठी खिर्डी, भाटी, भेनसेत,खोबळा काहंडोळचोंड,मांडवे, सरमाळ, इ. गावे हे गुजरातच्या सीमेवर वसलेली अशी अनेक आदिवासी दुर्गम पाडे आहेत. या अतिदुर्गम पाड्यातून गोर, गरीब नागरिक उपचार घेण्यासाठी येतात परंतु त्यांच्या पदरी फक्त निराशाच पडते, कधी गोळया औषधे संपतात तर कधी एक कर्मचारी असतो तर दुसरा गायप या सगळ्या प्रकाराला कंटाळून नायईलाजाने नागरिकांना खाजगी रुग्णालयाकडे धाव घ्यावी लागते .या रुग्णालयातील हा सगळा गैरप्रकाराबाबत नागरिकांच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या म्हणुन गावातील सामाजिक कार्यकर्ते विलास जाधव, चंद्रकांत जाधव, पांडुरंग बिरार, हे सामाजिक कार्यकर्ते ग्रामिण रुग्णालयात गेले असता बरेच कर्मचारी अनुपस्थित आढळून आले व काही कर्मचारी मनमानी पद्धतीने गैर हजर आढळून आले.या सगळ्या प्रकाराकडे लोकप्रतिनिधी व प्रशासनाने लक्ष देऊन रुग्णांना सुरळीत सुविधा मिळाव्यात अशी मागणी केली.

 रक्त तपासणी रुग्ण

आज दि 20/12/2023 रोजी मी बाऱ्हे ग्रामिण रुग्णालयात रक्त तपासणी करिता आलो होतो पण या ठिकाणी कर्मचारी उपस्थित न्हवते .मी रुग्णालयातील उपस्थित डॉक्टर यांना विचारणा केली असता त्यानी संगितलं की लॅब मधील रक्त तपासणीच्या म्याडम कुठलीही रजा न घेता दुपारी मनमानी पद्धतीने निघून गेल्या त्यामुळं रक्त तपासणी उदया होईल असं मला सांगण्यात आले.- रामदास देशमुख रुग्ण

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

[yop_poll id="2"]
[yop_poll id="1" show_results="1"]

Most Popular

Recent Comments