HomeUncategorizedराज्य शासनाची कामे जनतेपर्यंत पोहोचवा: सुनिल पाटील

राज्य शासनाची कामे जनतेपर्यंत पोहोचवा: सुनिल पाटील

 शिवसेनेच्या आढावा बैठकीत संघटनवर चर्चा

सुरगाणा प्रतिनिधी

सुरगाणा तालुक्यातील प्रत्येक गट-गणात शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, बुथप्रमुख तसेच प्रतेक गावात शासनाच्या योजना पोचवण्यासाठी शिवदूतांची नेमणूक करा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्याला विकासाच्या प्रगतिपथावर नेत आहेत. त्यांची प्रत्येक विकासकामे गाव – खेड्यापर्यंत पोहोचवा. येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्था व विधानसभेवर शिवसेनेचा भगवा फडकविण्यासाठी सर्व शिवसैनिकांनी जोरदारपणे कामाला लागा, अशा सूचना दिंडोरी लोकसभेचे संपर्कप्रमुख तथा पक्ष निरक्षक सुनील पाटील यांनी केल्या. सुरगाणा येथील शासकीय विश्रामगृहात शिवसेना शिंदे गटाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. सहसंपर्क प्रमुख राजेंद्र सोनवणे, जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख मंगला भास्कर, तालुकाप्रमुख हरिभाऊ भोये , सुरगाणा नगरपंचायचे नगराध्यक्ष भरत वाघमारे, तुळशी राम पिठे शेतकरी सेना तालुका प्रमुख, शास्त्री गावित( उप तालुकप्रमुख, चिंतामण गायकवाड,(कळवण- सुरगाणा विधानसभा सहसंपर्क),नगसेविका पुष्पाताई वाघमारे, नगसेविका, अरूणा वाघमारे, नगसेविका प्रमिला भोये, नगरसेवक भगवान आहेर, तुकाराम जाधव, विनायक गावित, प्रभाकर महाले, योगेश ठाकरे, रमेश गायकवाड, गावित, माधव पवार, मनोज पवार, गिरिधर भोये, हेमराज जाधव, भास्कर चौधरी , शिवाजी पवार, एकनाथ भोये, आनंदा जाधव, चिंतामण वाघमारे आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हाप्रमुख तांबडे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून गावोगावी संघटनावर भर देण्याचे आवाहन केले व उपस्थित कार्यकर्त्यांच्या समस्या जाणून घेऊन, सोडविण्याचे आश्वासन दिलेतालुकाप्रमुख हरिभाऊ भोये यांनी लवकरच तालुक्यात ‘गाव तेथे शाखा, घर तेथे शिवसैनिक’ तयार करून पक्षाची मजबूत बांधणी करू, तसेच तालुक्यात जास्तीत जास्त शिवदूत नेमण्यात येतील असे सांगितले.

तालुक्यातील काही महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा करून लवकरच मार्गी लागतील, असा विश्वास तालुका प्रमुखांनी कार्यकर्त्यांना दिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात पक्ष मोठी भरारी घेत आहे. त्यामुळे तालुक्याला विकासाच्या माध्यमातून शिवसेनेची ओळख करून देण्यासाठी मी नेहमी कटिबद्ध राहीन.- हरिभाऊ भोये, तालुकाप्रमुख,शिवसेना

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

[yop_poll id="2"]
[yop_poll id="1" show_results="1"]

Most Popular

Recent Comments