Homeताज्या बातम्याअभोण्यात बुधवार दि. १३ पासून संगीतमय शिव महापुराण कथा व ज्ञानयज्ञ

अभोण्यात बुधवार दि. १३ पासून संगीतमय शिव महापुराण कथा व ज्ञानयज्ञ

टीव्ही फेम भागवताचार्य अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांच्या मधुर वाणीतून सादर होणार संगीतमय शिव महापुराण

अभोणा प्रतिनिधी 

येथील राम गल्लीतील श्री इच्छामणी गणेश मंदिराचा ३२ व्या वर्धापन दिनानिमित्ताने तरुण पिढीला विश्वबंधुत्व ,समाजसेवा , देशभक्ती व आत्मउन्नती करण्यासाठी भागवताचार्य अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांच्या मधुर वाणीतून संगीतमय शिव महापुराण कथा व ज्ञानयज्ञ सोहळा उद्या ( दि.१३ ) पासून आयोजित करण्यात आल्याची माहिती श्रीराम मित्र मंडळाचे अध्यक्ष उमेश दुसाणे यांनी दिली. बुधवार दि.१३ डिसेंबर ते बुधवार दि.२० डिसेंबर पर्यंत होणाऱ्या या शिवमहापुराण कथा व ज्ञानयज्ञ सोहळ्याची सुरुवात सवाद्य मिरवणूक काढून होणार आहे. सात दिवस चालणाऱ्या या कथेत रोज रात्री ८ ते १२ या कथेत बुधवार दि.१३ रोजी शिवपुराण , महात्म्य , बिंदुग आणि चंचुला , ब्रह्मा – विष्णू यांचा वाद , शंकराचा शाप आदी गुरुवार दि.१४ रोजी नारदाची तपश्चर्या , विष्णूंचा नारदांना उपदेश , शिव तत्व वर्णन आदी शुक्रवार दि. १५ रोजी सती चरित्र , संध्या व कामदेवाचे प्राकल्य , कामदेवाला शाप आदी , शनिवार दि. १६ रोजी हिमालायचा मैनेशी विवाह , पार्वतीचे कन्यादान आदी , रविवार दि.१७ रोजी शिव पुत्राचा जन्म , तारकासुर वध , गणेशाची उत्पत्ती , देवांशी युध्द , गणपती विवाह आदी ,सोमवार दि. १८ रोजी त्रिपुरा सुराचा वध , इंद्राला जीवदान , तुलसीचा शाप , गजासुराचा वध आदी , मंगळवार दि.१९ रोजी नंदिकेश्वर अवतार , कालभैरव अवतार , अर्जुन तपश्चर्या आदी व बुधवार दि. २० रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत ह.भ.प.भागवताचार्य प्रकाशजी महाराज जाधव यांचे काल्याचे कीर्तन व महाप्रसादाने सांगता होणार आहे. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्रीराम मित्र मंडळासह ग्रामस्थ प्रयत्नशील आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

[yop_poll id="2"]
[yop_poll id="1" show_results="1"]

Most Popular

Recent Comments