Homeताज्या बातम्याकांदा निर्यात बंदीमुळे उत्पादक परेशान

कांदा निर्यात बंदीमुळे उत्पादक परेशान

निर्यातबंदी च्या विरोधात येवल्यात रास्तारोको…

येवला प्रतिनिधी

केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी जाहीर केल्याने कांदा बाजारभाव गडगडले असून येवला कृषी उत्पन्न बाजार समितीचे समोर मनमाड नगर महामार्गावर शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे रास्ता रोको केला. बाजार समिती समोर रस्त्यावर शेतकऱ्यांनी ठिय्या देत आंदोलन केले. यावेळी महामार्ग वरील वाहतूक खोळंबली होती. शेतकऱ्यांकडून केंद्र सरकार व राज्य सरकार विरोधात घोषणा देण्यात आल्या. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या निर्यातबंदीमुळे चार हजार रुपये विकणारा कांदा अचानक २००० पेक्षाही खाली विकायला सुरुवात झाली त्यात कृषी उत्पन्न बाजार समिती देखील आता लिलाव बंद झाल्यामुळे शेतकऱ्यांचा संताप झाल्याचे दिसत आहे. केंद्र सरकारने कांद्यावर अचानकपणे शुक्रवार दिनांक ८ डिसेंबर रोजी निर्यात बंदी लादल्याने कांद्याचे भाव पडले आहे. आधीच अवकाळी व गारपिटीमुळे लाल कांद्याचे नुकसान झाले आहे, त्यातच शेतकऱ्यांकडे कांदा शिल्लक नाही अन आहे त्या कांद्यात थोडाफार भाव मिळत असल्याने केंद्र सरकारने नागरी शहरातील लोकांचा विचार करत तातडीने निर्यात बंदी लादली असल्याचा आरोप शेतकरी करीत होते. शेतकऱ्यांच्या भावना तीव्र असल्याने राज्यशासनाने तातडीने पाऊले उचलण्याची आवश्यकता आहे असल्याचे शेतकऱ्यांचे मागणी केली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

[yop_poll id="2"]
[yop_poll id="1" show_results="1"]

Most Popular

Recent Comments