Homeक्राईमअवैध दारु विक्री प्रकरणाच्या चौकशीसाठी बोलाविलेल्या संशयीताकडुन पोलिसास मारहाण

अवैध दारु विक्री प्रकरणाच्या चौकशीसाठी बोलाविलेल्या संशयीताकडुन पोलिसास मारहाण

वणी / प्रतिनिधी

लखमापुर येथील फळ विहीरी समोर पत्र्याच्या शेडमधे चोरट्या रितीने अवैध दारु साठा व अवैध दारु विक्री करत असल्याच्या तक्रारीची चौकशी करण्यासाठी वणी पोलिस ठाण्यात बोलावले असता तपासी अमलदार कक्षात फिर्यादी पोलिसाच्या अंगावर धावून जाऊन सरकारी गणवेशातील कर्मचाऱ्याची गच्ची धरुन धक्काबुक्की करुन खाली पाडुन शासकीय कामात अडथळा निर्माण केला, या आरोपावरुन संशयीतावर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. या बाबत वणी पोलिसांनी दिलेली माहीती अशी की, लखमापुर ता.दिंडोरी येथील फळ विहीरी समोर पत्र्याच्या शेडमध्ये अवैध दारु साठा व अवैध दारु विक्री होत असल्याची माहीती पोलिसांना मिळाली.याबाबत चौकशी साठी रविराज गजानन सोनवणे रा.लखमापुर याला वणी पोलिस ठाण्यात बोलावले असता चौकशी दरम्यान अमलदार कक्ष येथे माझेवर प्रोव्हीशन गुन्हा का दाखल करता यावरुन कुरापत काढुन वाईट साईट शिवीगाळ केली.वादविवाद व हुज्जत घालुन पोलिस हवालदार धनंजय दशरथ शिलावटे यांना वाईट साईट शिवीगाळ केली. माझ्यावर दारुची केस केली तर तुम्हाला कामाला लावतो अशी दमदाटी केली. शिलावटे यांचे अंगावर धाऊन गेल्याने शिलावटे यांनी सौम्य भाषेत सोनवने यांना समजावले .कायदेशीर कारवाई करत आहोत असे सांगितले. याचा सोनवणे यांना राग आला.पोलिस हवालदार शिलावटे यांचे अंगावर धाऊन जात त्यांची गच्ची धरली.धक्काबुक्की करुन तु कशी कायदेशीर कारवाई करतो ते बघतोच अशी दमदाटी केली. व शिलावटे यांना खाली पाडले.त्यामुळे त्यांच्या कमरेस मुक्का मार लागला.व आपखुशीने दुखापत करुन शासकीय कामात अडथळा आणल्याची फिर्याद हवालदार शिलावटे यांनी दिल्याने रविराज सोणवणे यांचेवर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे.गेल्या काही दिवसांपुर्वी कोशिंबा येथे अवैध दारू विक्री करणारांनी विशेष पोलिस पथकावर असा प्रकार केला होता.आता थेट पोलिस ठाण्यातच असे प्रकार घडु लागल्याने तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

[yop_poll id="2"]
[yop_poll id="1" show_results="1"]

Most Popular

Recent Comments