Homeताज्या बातम्याजामलेवणीत 85 महिलांना रोजगार प्रशिक्षण

जामलेवणीत 85 महिलांना रोजगार प्रशिक्षण

ठाणापाडा प्रतिनिधी 

महिला सबलीकरण व सक्षमीकरण यासाठी आदिवासी खेडेपाड्यातील ग्रामपंचायतीत पेसा निधी मधून महिलांना रोजगार निर्मितीचे प्रशिक्षण दिले जाते. याच अनुषंगाने जामलेवणी ग्रामपंचायत अंतर्गत जयकला बहूउद्देशीय फाउंडेशनच्या माध्यमातून 85 महिलांना शिवणकामाचे महिनाभर प्रशिक्षण देण्यात आले.
ग्रामीण भागातील आदिवासी महिलांना रोजगारातून आर्थिक मदत व्हावी व महिला सक्षमीकरण होऊन रोजगार निर्मिती व्हावी व त्यांच्या कुटुंबाचा विकास व्हावा या हेतूने प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षण काळात महिलांना शिवणकामाच्या विविध प्रकारची माहिती दिली. विविध डिझाईन कसे तयार करावे. याबाबतचे प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर जयकला बहुउद्देशीय फाउंडेशन तर्फे या महिलांना ग्रामपंचायत जामलेवणी अंतर्गत प्रमाणपत्र वितरण केले. यावेळी महिलांनी ग्रामपंचायतीला घड्याळ भेट देऊन सरपंच, सर्व सदस्य व ग्रामसेवक यांचे आभार मानले. सदर प्रशिक्षणच्या समारोप प्रसंगी प्रशिक्षणार्थींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. प्रमाणपत्र वितरण सोहळ्यास जयकला बहुउद्देशीय फाउंडेशनच्या प्रमुख सविता जयराम गावित, सुनंदा रविंद्र गांगुर्डे (प्रशिक्षण शिक्षिका), ललिता नामदेव भरसट, (सरपंच) धनराज काळू ठाकरे (उपसरपंच), देविदास मनोहर गांगुर्डे, दिलीप उत्तम गांगुर्डे, भास्कर लक्ष्मण कवर, सीमा कृष्ण ठाकरे, कल्पना रोहिदास कवर, ताई वामन ठाकरे, विमल सोनिराम गांगुर्डे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, पांडुरंग गावित (ग्रामसेवक), नलिनी वसंत ठाकरे, मनोहर पांडुरंग ठाकरे, अशोक ठाकरे (पोलीस पाटील), वामन ठाकरे, अरुण गांगुर्डे व ग्रामस्थ उपस्थित होते

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

[yop_poll id="2"]
[yop_poll id="1" show_results="1"]

Most Popular

Recent Comments