Homeताज्या बातम्यानऊ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त करत संशयित ताब्यात

नऊ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त करत संशयित ताब्यात

जायखेडा प्रतिनिधी

गुजरातहून महाराष्ट्रात चोरट्यामार्गाने आलेला ८ लाख ७८ हजार ५८० रुपयांचा गुटखा जायखेडा पोलिसांनी ताहाराबाद सटाणा रस्त्यावरील मुल्हेर चौफुलीवर जप्त केला. गुटख्याची चोरटी वाहतूक करत असल्याची बातमी सहायक पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सापळा लावून मारोती कंपनीची (एमएच ४१/ एम २३६५) ब्रिझा संशयित गाडी थांबवून तपासली असता त्यात पानमसाला गुटखा भरलेले पोते दिसून आले. याप्रकरणी शाहरुख रफिक तांबोळी (२८, डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर, सटाणा) याला ताब्यात घेतले आहे. आसिफ शबीर तांबोळी (रा. सटाणा) हा फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहे. या कारवाईत गुजरातहून महाराष्ट्रात चोरट्यामार्गाने आलेला ८ लाख ७८ हजार ५८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलिस अधीक्षक शहाजी उमाप, अपर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती, उपविभागीय पोलिस अधिकारी पुष्कराज सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली जायखेडा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाट व त्यांचे सहकारी पोलिस उपनिरीक्षक वाघमारे, पोलिस सुनील पाटील, पोलिस नाईक भगरे यांनी केली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

[yop_poll id="2"]
[yop_poll id="1" show_results="1"]

Most Popular

Recent Comments