Homeताज्या बातम्यापोलीस आयुक्त संदीप कर्णिक एक्शन मोडवर शहरात कोंबिंगसह ऑल आऊट ऑपरेशन जोरात

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक एक्शन मोडवर शहरात कोंबिंगसह ऑल आऊट ऑपरेशन जोरात

नाशिक / प्रतिनिधी

शहराचा ताबा गुन्हेगारांनी घेतला की काय अशी टिकेची झोड उठत असताना शहर आयुक्तालयाच्या हद्दीत आयुक्त पदाची धुरा सांभाळताच दोन खुनाच्या घटनेने शहर परिसर हादरून गेले होते, याची गंभीर दखल घेत नवनिर्वाचित पोलीस आयुक्त संदीप कर्णिक ॲक्शन मोडवर आल्याचे दिसून येत आहे संध्याकाळपासूनच शहरभर गुन्हेगारांची धरपकड करण्यास आयुक्तालयातील पोलिसांनी सुरुवात केली असून शहरातील सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये कोंबिंग तसेच ऑल आऊट ऑपरेशन राबवण्यास सुरुवात करण्यात आली आहे त्याचबरोबर मद्यपान करून रस्त्यावर टवाळकी करणारे तळीरामांना देखील खाकीने चांगलाच दणका देत ताब्यात घेतले आहे यापुढे देखील शहरात नित्यनेमाने गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी रस्त्यावर उतरून व्हीजवल पोलीसिंग तसेच इफेक्टिव्ह पॉलिसींवर जास्तीत जास्त भर दिला जाणार आहे तसेच शहर लवकरच भयमुक्त करणार असल्याबाबत देखील शहर आयुक्तालय कटिबद्ध असल्याचा संदेश सर्वसामान्य नाशिककरांना देण्यात येत आहे. पकडण्यात आलेल्या टवाळखोरांवर तसेच मद्यपींवर 151 प्रमाणे कारवाई करण्यात येणार असून यापुढे कुणाचीही गय केली जाणार नाही असा सज्जड इशारा शहर पोलिसांनी गुन्हेगारांना दिला आहे. या कारवाईदरम्यान चार उपायुक्त, सात सहाय्यक पोलीस आयुक्त, 30 पोलीस निरीक्षक, 125 पोलीस उपनिरीक्षक व सहाय्यक पोलीस निरीक्षक तसेच 1150 अमलदारांचा या कारवाईत सहभाग आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

[yop_poll id="2"]
[yop_poll id="1" show_results="1"]

Most Popular

Recent Comments