Homeक्राईमसेवा निवृत्त लष्करी कर्मचाऱ्याचा खून म्हसरूळ - आडगाव लिंक रोडवरील घटना

सेवा निवृत्त लष्करी कर्मचाऱ्याचा खून म्हसरूळ – आडगाव लिंक रोडवरील घटना

पंचवटी प्रतिनिधी  

म्हसरूळ – आडगाव लिंक रोडवरील सुरती फरसाण समोरील मोकळ्या पटांगणात सेवा निवृत्त वायु सेना दलातील कर्मचाऱ्याचा खून झाल्याची घटना सोमवार ( दि २७ ) रोजी रात्री घडली असुन माहिती मिळताच तातडीने म्हसरूळ पोलीस घटनास्थळी दाखल होत. या प्रकरणी म्हसरूळ पोलिसांनी दोन संशयित ताब्यात घेतले आहे. रविदत्त राजेंद्र चौंबे (वय ४२) असे मयताचे नाव असुन पुढील तपास म्हसरूळ पोलीस करीत आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, म्हसरुळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील म्हसरूळ – आडगाव लिंक रोडवर रात्री सात ते साडे सात वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. घटनेनंतर म्हसरुळ पोलिसांनी दोघा संशयित मारेकऱ्यांना ताब्यात घेतले आहे. रवी चौबे हे सायंकाळी साडे सहाच्या सुमारास सहकुटुंब कारने जात होते. त्यावेळी सुरती फरसाण कंपनीसमोर दोन तरुण मद्यधुंद अवस्थेत गोंधळ घालत होते. त्यांनी आरडाओरड करीत वाहतूक अडवली. त्यामुळे चौबे यांनी दोघांचा पाठलाग केला. मात्र त्यापैकी एकाने चौबे यांच्या छातीवर धारदार शस्त्राने वार केल्याने चौबे गंभीर जखमी झाले. म्हसरुळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चौबे यांना प्रथम खाजगी रुग्णालयात दाखल केले, मात्र, त्यांना शासकिय रुग्णालयात घेऊन जात असताना त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी म्हसरुळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम मध्यरात्री सुरु होते. चौबे हे भारतीय लष्करातील सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. शहरातील एका शैक्षणिक संस्थेत ते वॉर्डन म्हणून कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे.

टाेळीचा सहभाग !

घटनेतील दाेन संशयितांसह त्यांचे साथीदार हे म्हसरूळ आडगाव लिंक रोडवर येणाऱ्या – जाणाऱ्या वाहनांना अडवत होते, अशी माहिती पुढे येत आहे. तर सुरती फरसाण व जगन्नाथ लॉन्सजवळ संशयितांनी मद्याच्या नशेत अनेक वाहने अडवून काही वाहनांच्या काचा फोडल्याचे समजते. यातील काही पीडित चालक हे संशयितांची गुंडागर्दी सुरु असल्याची कैफियत घेऊन म्हसरूळ पोलिस ठाण्यात गेले हाेते. त्याचवेळी तेथे संशयितांनी चाैबे यांच्यावर हल्ला करुन हत्या केली.

नवनियुक्त पोलीस आयुक्तांची घटना स्थळी पाहणी

नवनियुक्त पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी मध्यरात्री म्हसरूळ – आडगाव लिंक रोडवरील घटना स्थळी पाहणी करत सविस्तर माहिती जाणुन घेतली. तसेच पुढील तपासाबाबत पोलीस अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

[yop_poll id="2"]
[yop_poll id="1" show_results="1"]

Most Popular

Recent Comments