Homeताज्या बातम्याबळीराजा रडला ... चिडला... साहेब...

बळीराजा रडला … चिडला… साहेब…

ओझर प्रतिनिधी 

पोटच्या पोरा सारखा बाग जपला रविवारच्या पावसाने काही मिनटात होत्याच नव्हत केल आता काहीच राहील नाही शासन फक्त घोषणा करत पंचनाम्याचे आदेश होतात.. पंचनामे होतात.. एकरी दोन ते तीन लाख खर्च होतो पण मदत खुपच तोकडी होते साहेब द्यायची तर भरभक्कम मदत द्या तोकडी मदत देऊ नका आमचे पीककर्ज माफ करा अशी आर्जव विनंती नुकसानग्रस्त शेतक-यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली कसबे सुकेणे व मौजे सुकेने तसेच पिंपरी आणि रौळस या शिवारात गारपीट अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मोठ्याप्रमाणत नुकसान झाले नुकसानीची पाहणी पालकमंत्री दादाजी भुसे, जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी कसबे सुकेणा येथील संतोष भंडारे भारत मोगल यांच्या द्राक्षबागेची पाहणी करत नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे तातडीने दोन दिवसात पूर्ण करून शेतकऱ्यांना तत्काळ मदत देणार असल्याचे आश्वासित केले आहे यावेळी काही माध्यमकर्मीवर शेतक-यांनी आपला रोष व्यक्त केलार विवारी दुपारनंतर निफाड तालुक्यातील ओझर, दिक्षी दात्याने, जिव्हाळे, थेरगाव, ओणे, कसबे सुकेणे, मौजे सुकेणे पिंपळस या भागात गारपीट अवकाळी पावसामुळे द्राक्ष पिकासह कांदा, ऊस, टोमॅटो, फळबागा, पालेभाज्या आदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीचे येत्या दोन दिवसांत पंचनामे पूर्ण करण्याचे निर्देश राज्याचे सार्वजनिक बांधकाम तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी अधिकार्‍यांना दिले.तसेच ज्या शेतकर्‍यांनी पीकविमा काढला असेल, त्या शेतकर्‍यांनीही झालेल्या नुकसानीबाबत पीकविमा कंपनीकडे नोंदणी करण्याचे आदेश अधिकार्‍यांना दिले. याशिवाय कोणीही आपत्तीग्रस्त नुकसानीच्या मदतीपासून वंचित राहू नये, तसेच नुकसानग्रस्तांना तात्काळ आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार असल्याचे पालकमंत्री भुसे यांनी शेतकर्‍यांना अश्वासित केले. दरम्यान, यावेळी आमदार दिलीप बनकर, माजी आमदार अनिल कदम, निफाडच्या उपविभागीय अधिकारी हेमांगी पाटील, तहसिलदार शरद घोरपडे, उपविभागीय कृषी अधिकारी संजय सुर्यवंशी, तालुका कृषी अधिकारी सुधाकर पवार, कृषी पर्यवेक्षक प्रमोद पाटील, कृषी सहाय्यक योगेश निरभवणे, दिलीप मोरे, गोकुळ गीते, प्रणव पवार दिलीप मोरे विश्वास भंडारे, दीपक शिरसाठ, नाना पाटील भंडारे, समाधान सुर्वे, सरपंच आनंदराव भंडारे, ग्रामसेवक रवी अहीरे यांच्यासह अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

२६ |११ ची काळी दुपार

गेल्या सलग चार ते पाच वर्षांपासून शेतकरी विविध अस्मानी सुलतानी संकटाचा सामना करत कसाबसा तग धरत असतांना यावर्षी त्याला उत्पादनातुन यश दिसत होते परंतु रविवार २६\११ ला दुपारी अडीच वाजता सुरू झालेला पाऊस व त्या सोबतच गारपीटाने त्यांचा तोंडचा घास हिरावुन घेतला काही क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले सुपारीच्या आकाराच्या टपोऱ्या गारांनी द्राक्षघड जमीनदोस्त झाले तर निर्यातक्षम द्राक्षबागांचा काही वेळातच चुराडा होऊन तालुक्यात काही कोटींचे नुकसान झाले एकरी दोन ते तीन लाख उत्पादन खर्च होत असल्याने नुकसानग्रस्त शेतकरी गलितगात्र झाले.सरकार तोकडी मदत करत असल्याने आता कोणाकडून अपेक्षा ठेवायची याची चिंता बळीराजाल पडलीय त्यामुळेच पालकमंत्री दादा भुसे यांच्या पाहणी दौऱ्याच्या वेळी काही शेतक-यांना रडु कोसळले तर काहींनी आपल्या मागण्या पुर्ण व्हाव्यात या साठी रोष व्यक्त केला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

[yop_poll id="2"]
[yop_poll id="1" show_results="1"]

Most Popular

Recent Comments