Homeक्राईमनांदगावात दोन बालिका वधू बाळंत आई-वडिलांसह पती व सासू-सासर्‍यांवर गुन्हा दाखल

नांदगावात दोन बालिका वधू बाळंत आई-वडिलांसह पती व सासू-सासर्‍यांवर गुन्हा दाखल

नांदगाव/प्रतिनिधी

मानवाने विज्ञान युगात उल्लेखनीय कामगिरी करत जुन्या अनिष्ट चालीरीतींना तिलांजली देत आपलं वेगळं अस्तित्व व स्थान निर्माण केलेलं असतानाही आजच्या या वैज्ञानिक युगात काही माणसांची मनोवृत्ती आजही इतकी मागासलेली असेल याची प्रचिती येताच साक्षरता अजूनही प्रत्येकापर्यंत पोहोचलेली दिसत नाही, नांदगाव मध्ये घडलेला असाच एक प्रकार ज्या मधून हे सत्य उलगडत आहे, वेगवेगळ्या दोन घटनांमध्ये अल्पवयीन बालिकांचे आपल्या आई-वडिलांनी लग्न लावून दिलं, गरोदर झाल्यानंतर बाळंतपणासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर गरोदर माता या अल्पवयीन असल्याची बाब समोर आली परिस्थितीचे गांभीर्य ओळखत दोन्ही अल्पवयीन गरोदर मातांचं बाळंतपण सुखरूप करण्यात आले मात्र याची कल्पना पोलीस प्रशासनाला दिल्यानंतर नांदगाव पोलिसात बालविवाह प्रतिबंधक कायद्याप्रमाणे तसेच बलात्कार आदी कलमान्वये गुन्हा नोंदवून सर्व संशयतांना ताब्यात घेण्यात आले आहे. अल्प वयात लग्न केल्याने आई, वडील यांचेसह पती व सासू – सासरे अशा तब्बल दहा संशयितांवर गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळाली असून, याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अल्पवयीन मुलींचे लग्न लावून त्या गरोदर राहिल्यानंतर डिलिव्हरी साठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्यानंतर हे प्रकरण लक्षात आले या प्रकरणी पहिल्या घटनेत पळाशी (ता.नांदगाव) येथील पीडितेचे वडील भगवान नाना पवार, आई वैशाली पवार तर चिंचविहिर येथील पती रवींद्र मधुकर भवर, सासू सुमनबाई भवर, सासरे मधुकर भवर यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर दुसऱ्या घटनेत पळाशी (ता.नांदगाव) येथील पीडितेचे वडील संतोष विठ्ठल बोरकर, आई शोभा संतोष बोरकर, पती अंकुश श्रावण बोरकर तसेच नांदूर (ता.नांदगाव) येथील श्रावण केदु व्हडगर, सासू संगीता श्रावण व्हडगर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नांदगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मनोज वाघमारे आणि बहाकर हे पुढील तपास करत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

[yop_poll id="2"]
[yop_poll id="1" show_results="1"]

Most Popular

Recent Comments