Homeताज्या बातम्यामनपा सिडको विभागीय अधिकारी पाटील व कर्मचारी यांच्यावर ऍट्रॉसिटी कायाद्या अंतर्गत गुन्हा

मनपा सिडको विभागीय अधिकारी पाटील व कर्मचारी यांच्यावर ऍट्रॉसिटी कायाद्या अंतर्गत गुन्हा

सिडको प्रतिनिधी 

अतिक्रमण कार्यवाही दरम्यान संसार उपयोगी वस्तूंचे नुकसान करून तसेच जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात संशयित  सिडको मनपा विभागीय अधिकारी डॉक्टर मयूर पाटील तसेच अतिक्रमण विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांसह जागा मालकावर ऍट्रॉसिटी कायाद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार  दिनांक ४ ओक्टोबर २०२ ३ रोजी प्लॉट नंबर ३२ वृंदावन नगर कामाठवाडे नाशिक या ठिकाणी गेल्या पंचवीस वर्षांपासून देखरेख तसेच वॉचमेन म्हणून वंदनाबाई किसन अंभोरे (४८, मजुरी) या कुटुंबासहीत जागेचे मालक सांगण्यावरून गेल्या २५ वर्ष्यांपासून राहत होत्या. आम्हाला राहण्यासाठी जागा मालकाने कोणत्याही प्रकारे कधीही टोकले नाही. मात्र दिनांक ४ ओक्टोबर २०२ ३ रोजी सकाळी १० वाजता आम्ही या ठिकाणी राहत असतांना महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे कर्मचारी आले. याबाबत आम्हाला कोणतीही पूर्वसूचना अथवा नोटीस न देता  जागा मालकाच्या सांगण्यावरून आमचे राहते घर जेसीबी च्या सह्याने तोडून घरातील संसार उपयोगी साहित्य अतिक्रमण कर्मचारी सोबत घेऊन गेले.तसेच घर तोडत असतांना घरावरील झेंडा व महापुरुषांचे फोटो तोडून फोडून नुकसान केले. तर प्रसंगी परिवारासह फिर्यादीस शिवीगाळ केल्याचा आरोप फिर्यादी यांनी केला आहे. या प्रकरणी संशयित  नाशिक महानगर पालिका सिडको विभागीय अधिकारी डॉ. मयूर पाटील यांच्यासह अतिक्रमण विभागाचे अधिकारी, कर्मचारी व जागेचे मालक सुरेंद्र खाडे यांसह एका तोतया पोलिसावर ऍट्रॉसिटी  कायदा अंतर्गत अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

मनापाच्या उपाआयुक्य कार्यालयाकडून आलेल्या आदेशानुसार कार्यवाही झालेली असून पोलीस तपासात याबाबत सत्य निष्पन्न होणारच आहे. – डॉ. मयूर पाटील, नाशिक महानगर पालिका सिडको विभागीय अधिकारी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

LEAVE A REPLY Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version