Homeताज्या बातम्याकादवा चा गळीत हंगाम व डीस्टीलरी प्रकल्प सुरळीत सुरु

कादवा चा गळीत हंगाम व डीस्टीलरी प्रकल्प सुरळीत सुरु

दिंडोरी प्रतिनिधी 

  1. कादवा सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम व डीस्टीलरी प्रकल्प सुरळीत सुरू झाले असून साखर व स्पिरीटचे पूर्ण क्षमतेने उत्पादन सुरू झाले आहे. कादवा गेल्या काही वर्षापासून सातत्याने उसाला जिल्ह्यात सर्वाधिक भाव देत असून सर्वाधिक भाव देण्याची परंपरा कायम राखणार असून शेतकऱ्यांनी कादवा ला ऊस पुरवठा करावा असे आवाहन चेअरमन श्रीराम शेटे यांनी केले आहे. कादवा ची गाळप क्षमता 2500 मेटन प्रतिदिन असून कादवा ने पुरेश्या प्रमाणात ऊस तोड कामगारांची भरती केली आहे.ऊस तोडणी चा कार्यक्रम आखण्यात आला असून त्यानुसार ऊस तोडणी सुरू आहे रविवारी २५७२.२४० में.टन गाळप होत १०.०५ टक्के साखर उतारा मिळाला आहे. तर या हंगामात आतापर्यंत ३३०४०.६८७ मे.टन गाळप होत २९४५० क्विंटल साखर निर्मिती होत सरासरी साखर उतारा ९.११%मिळाला आहे. डीस्टीलरी प्रकल्प शुभारंभ नुकताच करण्यात आला यावेळी चेअरमन श्रीराम शेटे व्हा.चेअरमन शिवाजीराव बस्ते,सर्व संचालक,अधिकारी कामगार उपस्थित होते.सदर प्रकल्पात पूर्ण क्षमतेने स्पिरीट निर्मिती सुरू झाली असून लवकरच इथेनॉल निर्मिती होणार आहे.

कादवाला ऊस पुरवठा करावा.

कादवा चे गाळप पूर्ण क्षमतेने सुरू असून कादवा उसाला सर्वाधिक ऊस दर सातत्याने देत आला आहे यंदा पहिला हप्ता रू. 2500 दिला जाणार असून हंगाम संपताच शासन नियमानुसार अंतिम एफआरपी दर ठरणार आहे .सर्वाधिक ऊस भाव देण्याची परंपरा कायम राखली जाणार आहे तरी शेतकऱ्यांनी कोणतीही घाई न करता ऊस तोडणी कार्यक्रमानुसार ऊस तोड करत कारखान्याचे उज्वल भवितव्यासाठी कादवा लाच ऊस पुरवठा करावा.
श्रीराम शेटे
चेअरमन कादवा सहकारी साखर कारखाना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

LEAVE A REPLY Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version